शेतकऱ्यांपासून लाडक्या बहिणींपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात दिले काय??, वाचा तपशीलवार!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा 2026 – 27 चा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र शासन संपूर्ण देशातच काय, पण जगातही Infra Man म्हणून ओळख आहे
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आज मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिट मुळे निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्राचा 2026 – 2027 सालचा अर्थसंकल्प सादर करावा लागला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाराष्ट्राचा 2026 – 27 चा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र शासन संपूर्ण देशातच काय पण जगातही Infra Man म्हणून ओळख आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी सात राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवीन नियुक्त्या केल्या. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी तामिळनाडूचे माजी राज्यपाल आर.एन. रवी यांची नियुक्ती करण्यात आली. तर जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतील.
मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ नमाज पठणाची परवानगी देण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही आणि कोणत्याही ठिकाणी नमाज पठण करणे हा धार्मिक अधिकार मानला जाऊ शकत नाही.
इराण विरोधात अमेरिका आणि इजरायलने सुरू केलेल्या आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचे वाटप थांबवण्यात आले आहे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सेवेत असताना मद्यपानास आळा घालण्यासाठी प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आगारात कामावर हजर होणाऱ्या सर्व चालक आणि वाहकांची अल्कोटेस्ट मशीनद्वारे दररोज तपासणी सक्तीची करण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे अंदाज चुकवत मोठे ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या राज्यसभेची एकच जागा येत असताना, उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या आक्रमक प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मैदानात उतरवले आहे. ज्योदी वाघमारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला.
राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘संस्कृती’ आणि ‘सौहार्द’ पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज संध्याकाळी साडेसहा वाजता ‘मातोश्री’वर जाणार आहेत.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने ५१ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा ओलांडत देशाच्या ७.४ टक्क्यांच्या तुलनेत ७.९ टक्के विकासदराची विक्रमी झेप घेतली. ५१ लाख कोटींची अर्थव्यवस्था असणारे महाराष्ट्र देशातील नंबर १ राज्य ठरले आहे. कारण उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था २९.७८, प. बंगाल २८.८४, कर्नाटक २८.८४ तर तामिळनाडूची ३१.१९ लाख कोटी रुपयांची आहे. गुरुवारी सादर झालेल्या २०२५-२६ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकडा समोर आला.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहासमोर ठेवला. याचसोबत महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी विधेयकाला देखील मंजूरी देण्यात आली आहे.
आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी देऊन एक अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर पाऊल उचलले असून, भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, हा राज्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रत्येकी एक, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळच्या उमेदवारी अर्जाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शरद पवार यांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यालयात उपस्थित न राहता आपला अर्ज दाखल केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की इराणने त्यांच्याशिवाय नवीन सर्वोच्च नेते निवडू नये. त्यांनी म्हटले आहे की नवीन नेता निवडण्यात अमेरिकेची भूमिका आवश्यक आहे आणि अमेरिकेच्या सहभागाशिवाय असे करणे वेळेचा अपव्यय ठरेल.
भारतीय विमान वाहतूक उद्योग पुन्हा एकदा कठीण परिस्थितीतून जात आहे. एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतींमधील वाढ, डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया आणि मध्यपूर्वेतील सततचा तणाव यामुळे एअरलाईन्सच्या नफ्यावर दबाव वाढला आहे.
ज्या दिवशी म्हणजेच 5 मार्च 2026 रोजी पवार कुटुंबातल्या दोघांना बिनविरोध राज्यसभेत पाठविले, त्याच दिवशी महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने धर्मांतर विरोधी – लव्ह जिहाद विरोधी कायद्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले. याच फडणवीस सरकारमध्ये बाहेरून पवार कुटुंबात आलेल्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांनी होळी साजरी केल्यानंतर भाजपच्या मिशनमध्ये सामील झाले आहेत. होळी साजरी केल्यानंतर मुख्यमंत्री धामी आपले कर्तव्य बजावत बंगालमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी दीदींच्या सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले- दीदींनी घुसखोरांना येथे घुसखोरी घडवून आणली आहे.
आज अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा पाचवा दिवस आहे. अमेरिकेने श्रीलंकेजवळ भारतातून परतणारी इराणी युद्धनौका आयआरआयएस देनावर हल्ला करून ती बुडवली आहे. श्रीलंकेच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात आतापर्यंत ८७ इराणी खलाशी ठार झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला असे काही नाही. प्रत्येक पक्षाला आपल्या विद्यमान उमेदवारासाठी जागा मिळावी असे वाटत असते.
राज्यात पुन्हा एकदा ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना’ सुरू करण्यात आली आहे. यात भौगोलिक माहिती प्रणालीची मदत घेत शिवरस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक दिला जाणार आहेच, पण त्याच सोबत आता या रस्त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद केली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना घोषणा केली आहे. या रस्त्यांवरून भविष्यात वाद उद्भवू नये यासाठी डिजिटल रेकॉर्डही तयार करण्यात येणार आहे.
बिहार सारख्या मोठ्या राज्यात शांतपणे सत्तांतर घडवून नितीश कुमार राज्यसभेत येऊन भाजपच्या मुख्य टीम मध्ये सामील झाले, पण शरद पवार वयाच्या 86 व्या वर्षी राज्यसभेत येऊन सुद्धा अजून “राखीव” खेळाडूच्या भूमिकेतून बाहेर पडू शकले नाहीत.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातील बीजांडांची बेकायदेशीररीत्या काढणी व विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या गंभीर प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. आमदार चित्रा वाघ यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेद्वारे या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांच्या शोषणाचा हा प्रकार अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत, या रॅकेटमधील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलने 3 कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा ओलांडून जगातील नेत्यांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. अहवालानुसार, त्यांचे सबस्क्रायबर्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 40 लाखांपेक्षा 7 पट जास्त आहेत.