आधीच भाषा शिवराळ त्यात भरला अहंकार; राऊतांची स्वतःची तुलना आचार्य अत्रे, प्रबोधनकार आणि बाळासाहेबांशी!!


मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधताना शिवसेनेचे प्रवक्ते मावळते खासदार संजय राऊत यांची शिवराळ भाषा आता अहंकारा पर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना संजय राऊत यांनी स्वतःची तुलना आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी केली आहे. Already language Shivral filled it with ego; Raut compares himself to Acharya Atre, Prabodhankar and Balasaheb !!



राज ठाकरे यांच्यावर शरसंधान साधताना संजय राऊत म्हणाले, की दिवा विझताना मोठा होतो. हा भाजपचाच काल भोंगा वाजत होता. पण त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. ईडीने त्यांची वर्षा – दीड वर्षासाठी सुटका केली म्हणून भाषा बदलली आहे. मी शिवराळ भाषा वापरतो म्हणून टीका करतात. परंतु महाराष्ट्राची भाषा अशीच आहे. या भाषेचा मला आणि शिवसेनेला अभिमान आहे. अशीच भाषा आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे वापरत होते. किरीट सोमय्या महाराष्ट्र द्रोही आहे. तो शिव्याच देण्याच्या लायकीचा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रेझेंटेशन त्याने तयार केले होते. तुम्हाला वाटले तर तुम्ही त्याचा तुमच्या नव्या शिवतीर्थावर बोलावून सत्कार करा. परंतु आम्ही त्याच्या विरोधात शिवराळ भाषाच वापरणार, अशा भाषेत संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

– देवकांत बरूआ आणि संजय राऊत

हा निशाणा साधताना यांनी स्वतःची तुलना आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी करून घेतली आहे. संजय राऊत यांच्यावर किरीट सोमय्या टीका करतो. ती वैयक्तिक माझ्यावर नसून महाराष्ट्रावर आहे, अशी पुढची भाषा देखील संजय राऊत यांनी वापरली. संजय राऊत यांच्या या भाषेमुळे काँग्रेसची जुनी आठवण झाली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरुवा यांनी इंदिरा गांधी यांची अफाट स्तुती करताना “इंदिरा इज इंडिया” असे म्हटले होते. परंतु, त्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षात इंदिरा गांधींना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. इंदिरा गांधींची तुलना भारताशी करणाऱ्या देवकांत बरुआ यांचे राजकीय भवितव्य त्यावेळी जे झाकोळले ते परत कधीच वर आले नाही. त्यावेळी देवकांत बरुआ यांनी “इंदिरा इज इंडिया” असे म्हटले होते, तर आज संजय राऊत स्वतःच स्वतःला “महाराष्ट्र” म्हणून घेत आहेत… मग त्यांचे स्वतःचे राजकीय भवितव्य काय असेल…??

Already language Shivral filled it with ego; Raut compares himself to Acharya Atre, Prabodhankar and Balasaheb !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात