Nawab malik ED : संजय राऊत हे ईडीला धमकावतायत की उचकतायत…??; ईडी चौकशीला धार्मिक रंग देऊन पवार दुसरे काय करताहेत??


नाशिक : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. Nawab Malik ED: Is Sanjay Raut threatening ED or raising him … ??; What else can Pawar do by giving a religious color to the ED inquiry

नवाब मलिक हे मुस्लीम असल्यामुळे दाऊदचे नाव घेऊन त्यांना त्रास देण्यात येत आहे. केंद्र सरकार विरोधात स्पष्टपणे आणि स्वच्छ भूमिका घेतल्यामुळे केंद्र सरकार त्यांच्यावर चिडून आहे आणि म्हणूनच त्यांच्या मागे चौकशी लावण्यात येत आहे. 25 वर्षांपूर्वी दारू चे नाव घेऊन माझ्यावर देखील आरोप झाले होते परंतु ते सिद्ध झाले नाहीत, अशी आठवण शरद पवार यांनी करून दिली.

मुस्लिम कार्यकर्त्याला दाऊदचे नाव घेऊन त्रास देण्यात येतो आहे, असे सांगत शरद पवार यांनी या चौकशीला धार्मिक रंग देऊन नेमके काय साध्य केले आहे?, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आपल्या हातातील यंत्रणांचा गैरवापर करत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी त्यांना चौकशीच्या फेऱ्यात आडकवत आहे. हे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मात्र संजय राऊत यांनी त्या पुढे जाऊन 2024 पर्यंत हे सगळे चालेल. नंतर आम्हीच आहोत. आम्ही बघून घेऊ. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हे सगळे लक्षात ठेवावे. भाजपचे नेते आज आमच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लावताहेत. 2024 नंतर आम्ही त्यांच्या मागे तपासयंत्रणा लावू, अशी धमकी दिली आहे.



पण प्रत्यक्षात ही संजय राऊत यांची धमकी आहे की अधिकाऱ्यांना ते उचकवत आहेत?, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. संजय राऊत यांची भाषा आक्रमक आहे. परंतु गेल्या काही दिवसात अधिक शिवराळ झाली आहे. आता नवाब मलिक यांचे नाव दाऊदचा भाऊ इक्‍बाल कासकरने घेतल्यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे. अशा स्थितीत ईडीच्या अधिकाऱ्यांना, “तुम्हाला बघून घेऊ”, अशा धमक्या देऊन काही फरक पडणार आहे का?? किंवा “2024 नंतर आम्ही तुमच्याकडे बघू”, असे म्हणून 2022 च्या फेब्रुवारीत चौकशी थांबणार आहे का??, हा खरा प्रश्न आहे. शिवाय नुसत्या धमक्या देऊन आणि शिवराळ भाषा वापरून चौकशी थांबेल की चौकशीचा वेग वाढेल?? तपासाची गती कमी होईल ही तपासाची गती वाढेल??, याविषयी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ईडी चौकशीला शरद पवार धार्मिक रंग देतात. जयंत पाटील हे संयमित भाषेत केंद्र सरकारवर टीका करतात. परंतु संजय राऊत मात्र केंद्रीय तपास यंत्रणांना धमकावतात!!, यातून नेमका काय अर्थ काढायचा? ते ईडीच्या अधिकाऱ्यांना धमकावत आहेत की उचकवत आहेत??

शिवाय शरद पवार यांनी या सर्व प्रकरणात नवाब मलिक हे मुस्लीम असल्यामुळे दाऊदचे नाव घेऊन त्यांना त्रास देण्यात येत आहे, असे म्हटले आहे. ईडीच्या कारवाईला शरद पवार यांनी धार्मिक रंग दिल्याने शरद पवार देखील ईडीला चौकशी करण्यापासून रोखत आहेत की अधिकाऱ्यांना उचकवत आहेत??, हा प्रश्न आता तयार झाला आहे…!!

Nawab Malik ED : Is Sanjay Raut threatening ED or raising him … ??; What else can Pawar do by giving a religious color to the ED inquiry

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात