तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या मुंबई दौऱ्याचा तेलंगण आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये बराच बोलबाला झाला. राष्ट्रीय पातळीवरील मिडियाने त्याला थोडीफार प्रसिद्धी जरूर दिली, पण नेमके कालच पंजाब आणि उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतदान असल्यामुळे आपोआपच के. चंद्रशेखर राव यांच्या कथित राष्ट्रीय मोहिमेला तुलनात्मक दृष्ट्या राष्ट्रीय मीडियावर कमी प्रसिद्धी मिळाली. पण म्हणून के. चंद्रशेखर राव यांच्या राजकारणाला त्याचा फरक पडत नाही. कारण मुळातच के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणाचा आव आणला असला तरी त्यांचा डाव मात्र स्थानिक राजकारणासाठीच चाललेला दिसतो आहे. किंबहुना “राष्ट्रीय” राजकारणासाठी त्यांनी सुरुवातीलाच निवडलेले दोन राजकीय भिडू हे राष्ट्रीय राजकारणाचा आव आणून स्थानिक राजकारण करणारे दोन कसलेले नेते आहेत. K. Chandrashekhar rao Uddhav Thackeray and sharad pawar has limits of regional politics
यापैकी शरद पवार हे तर राष्ट्रीय राजकारणात प्रत्यक्ष वावरलेले नेते आहेत. पण “घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी” अशाच मराठी वाक्प्रचारा सारखे त्यांचे राजकारण राहिले आहे. सर्वोच्च पद मिळविण्यात अपयश आल्यानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणातला खरा रस संपला आणि उरला तो फक्त राष्ट्रीय राजकारण करण्याचा आव…!!
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तर कधी राष्ट्रीय राजकारणामध्ये उतरलेच नव्हते. त्यामुळे त्यांचा राष्ट्रीय राजकारणाचा दृष्टीकोण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फक्त हिंदुत्व संकल्पनेशी निगडित आहे. त्या पलिकडचा नाही. त्यामुळे चंद्रशेखर राव यांनी निवडलेले हे दोन राजकीय भिडू हे देखील राष्ट्रीय राजकारणाचा आव आणून स्थानिकच डाव खेळतात हे स्पष्ट आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी चंद्रशेखर राव यांच्या भेटीनंतर लगेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बाबत प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्साहाने विरोधक काही म्हणोत मुंबई महापालिका शिवसेना जिंकणार, असे सांगून त्याचे संकेत देऊन टाकले. तिसरी आघाडी – चौथी आघाडी या बोलायच्या गप्प आहेत. त्या अस्तित्वात येतील न येतील, त्या काँग्रेस सह अस्तित्वात येतील किंवा नाही येतील त्यांचा चंद्रशेखर राव उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या स्थानिक राजकारणाशि काही संबंध नाही. उलट स्वतःची राजकीय प्रतिष्ठा आणि सप्ता आपापल्या प्रांतांमध्ये आणि आपापल्या खरेतर विभागांमध्ये जपण्यासाठी हा राष्ट्रीय राजकारणाचा आव आणावा लागतो, तसा मुंबई भेटीत चंद्रशेखर राव, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आणला आहे.
शरद पवार यांनी तर आमची तेलंगण आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर चर्चा झाली त्यात विकास आणि दोन राज्यांमध्ये सहकार्य यावर भर होता, असे सांगून चंद्रशेखर राव यांच्या कथित राष्ट्रीय पातळीवर महाआघाडी करण्याच्य फुग्याला टाचणी लावली. चंद्रशेखर राव यांना देखील या सर्व गोष्टींची पक्की कल्पना आहे. त्यांना तेलंगणमध्ये भाजपला रोखायचे आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे आणि पवारांना महाराष्ट्र भाजपला ठोकायचे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची बांधबंदिस्ती करायची आहे. राज्य सरकारच्या बजेट म्हणून जास्तीत जास्त निधी आपल्या पक्षांकडे वाढवायचा आहे. आणि संकट काळात किंवा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने केंद्राकडून निधी मिळवायचा आहे. यापेक्षा पलिकडे जाऊन राष्ट्रीय पातळीवर भव्य दिव्य काही करण्याची त्यांची इच्छाही नाही… क्षमतेची तर बातच सोडा…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App