विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आता तर सिद्धूदेखील पळून गेलाय असे म्हणत एमआयएमआयचे असुद्दीन ओवेसी यांनी र्कांग्रेसला टोला मारला आहे. ज्यांना हे लोक प्रदेशाध्यक्ष बनवतात ते पळून जातात असे त्यांनी म्हटले आहे.Now that even Sidhu has fled, Asuddin Owaisi has slammed the Congress
ओवेसी म्हणाले, आता त्यांच्याबद्दल काय बोलावे, आता तर गरीब सिद्धूही पळून गेला आहे. ज्यांना हे लोक प्रदेशाध्यक्ष बनवतात, ते पळून जातात. नशीब आम्ही पंजाबला गेलो नाही, नाहीतर म्हटलं असतं ओवैसी तिथं गेला होता.
एकेकाळी तर तुम्ही देखील काँग्रेससोबत होतात, यावर प्रतिक्रिया देताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, दुधाने तोंड भाजल्यानंतर माणूस ताकही फूंक मारून पितो. त्यामुळे त्यांच्याबद्दल जेवढं आम्हाला माहित आहे, तेवढं कुणालाच माहित नसेल.
तेलंगणा वेगळं होण्याआधी जेव्हा आंध्र प्रदेश एकत्र होता, त्यावेळी त्यांच्या पक्षात बंडखोरी झाली होती. त्यांचे सरकार पडत होते, अशा काळात आम्ही त्याला मतदान केले. त्यावेळी त्यांना बी टीम आठवली नाही. राहुल गांधी अमेठीत हरले तर वायनाडला गेले. जिथं ३५ टक्के मतदार मुस्लिम होते.
पंजाबमध्ये कॅ. अमरिंदर सिंग यांच्याबरोबर वादात नवज्योत सिंग सिध्दू यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले. मात्र, तरीही वाद वाढत राहिल्याने कॅ. अमरिंदर सिंग यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, त्यानंतर सिध्दू यांनीही प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App