
विशेष प्रतिनिधी
मुंबई: उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. राज्यातील जनता महाविकास आघाडी सरकारला कंटाळली असून हे सरकार राज्याचा कोणताच विकास करु शकत नाही,. 32 वर्षांच्या पापाचा घडा भरल्याशिवाय राहणार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली . Uddhav Thackeray set out to destroy state, 32 year old will be punished, Narayan Rane alleges
राणे यांनी आज मुंबई विमानतळावरुन जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
राणे यांनी दादर येथील शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक स्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर जाऊन मी नतमस्तक झालो.
मी एवढंच सांगितलं की साहेब, आज तुम्ही मला आशीर्वाद द्यायला हवे होते. मला बाळासाहेबांनीच घडवलेलं आहे, दिलेलं आहे. आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव, माझा आशीर्वाद आहेत.
असं म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता. आज जरी हात नसला, तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत असं मला वाटतं, असं राणे म्हणाले. ही यात्रा यशस्वी होईल आणि येणारी महानगर पालिका भाजपा जिंकणार. ३२ वर्षांचा पापाचा घडा या ठिकाणी फुटल्याशिवाय राहणार नाही
Uddhav Thackeray set out to destroy state, 32 year old will be punished, Narayan Rane alleges
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : ठाकरे सरकार अनिल देशमुखांना ईडीच्या ताब्यात देण्याऐवजी लपवण्यात मश्गुल, किरीट सोमय्यांचा आरोप
- Bengal Post Poll Violence : ममतांच्या छत्रछायेखाली झालेल्या हिंसाचाराचा तपास सीबीआय करणार
- पुण्यातील नरेंद्र मोदी मंदिरातून पुतळा हटवला, थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातून आला होता फोन
- शब्दबंदी : दोन राज्ये दोन निर्णय…!! एक राजकीय, दुसरा धर्मभावनेतून…!!
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधूच्या कोचला अयोध्येला येण्याचे निमंत्रण का दिले…?? वाचा…