आरोग्यमंत्र्यांकडे पुण्यातील निर्बंध उठविण्याबाबत प्रस्ताव पाठविणार, अजित पवार सकारात्मक पण उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा महापौरांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

पुणे : आरोग्यमंत्र्यांकडे पुण्यातील निर्बंध उठविण्याबाबत प्रस्ताव पाठविणार आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील निर्बंध उठवण्याबाबत सकारात्मक आहेत पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचा आरोप पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. Will send proposal to health minister to lift restrictions in Pune, Pune Mayor Murli dhar Mohol

पुण्यातील व्यापाऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि सामन्यांना निर्बंध शिथिल करण्याबाबत पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिथिलतेसाठी प्रस्ताव देण्यास सांगितले असून त्यानुसार हा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

परंतु, मुंबई आणि इतर जिल्ह्यात शिथिलता देताना कोणते प्रस्ताव दिले होते? प्रस्ताव मागवून शिथिलता द्यायची? अशी प्रक्रिया कधी सुरू झाली? असा प्रश्न महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विचारला. ते म्हणाले पालकमंत्री सकारात्मकता दाखवतात. मात्र मुख्यमंत्री वेगळेच आदेश जारी करतात. तर आरोग्यमंत्र्यांची भूमिका वेगळीच आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया यांच्यासह व्यापारी संघटनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Will send proposal to health minister to lift restrictions in Pune, Pune Mayor Murli dhar Mohol

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात