पॅलेस्टिनी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सौम्या संतोष यांचा मृतदेह केरळमध्ये

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  : इस्त्राइल येथे पॅलेस्टिनी रॉकेटच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या केरळच्या सौम्या संतोष यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी कोचीन विमानतळावर आणण्यात आला.Dead body of somya santosh bought in India

आज सकाळी इस्राईलच्या विशेष विमानाने सौम्या संतोष यांचा मृतदेह नवी दिल्लीत आणण्यात आला आणि तेथून एअर इंडियाच्या विमानाने कोचीनला नेण्यात आला. यावेळी त्यांचे बंधू आणि नातेवाईक उपस्थित होते आणि तेथून तो मृतदेह गावी किरीथोडे येथे नेण्यात आला.



इडुक्की जिल्ह्यातील किरीथोडे गावच्या ३० वर्षीय सौम्या या इस्राईलमध्ये गेल्या आठ वर्षांपासून केअर टेकर म्हणून काम करत होत्या. इस्राईलच्या अश्के्लोन शहरात राहणाऱ्या सौम्या या मंगळवारी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पती संतोष यांच्याशी बोलत होत्या.

त्या भारतात परतण्याची तयारी करत होत्या. परंतु त्याचवेळी पॅलेस्टाईनच्या हमास संघटनेने डागलेले रॉकेट अचानक त्यांच्या घरावर पडले. यात त्यांचा मृत्यू झाला.

Dead body of somya santosh bought in India

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात