विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – जीवनावश्यiक औषधे आणि कोरोनावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची साठेबाजी आणि काळाबाजार तातडीने रोखण्यात यावा, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली आणि केंद्र सरकारला दिले आहेत. Shut down black market of medicines
न्या. विपिन संघी आणि न्या. रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर आज याबाबतच्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. कोरोनावरील उपचारासाठी वापरली जाणारी औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांचा जीवनावश्यीक वस्तूंच्या यादीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.
हा काळाबाजार रोखायचा असेल तर तातडीने पावले उचला त्यासाठी आमच्या आदेशांची वाट पाहू नका, असेही न्यायालयाने ताज्या आदेशांत म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि दिल्ली सरकारला देखील नोटीस बजावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App