वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनला आणखी मुदतवाढ दिल्याची आणि तो अधिक कडक करण्याची घोषणा मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज केली.lockdown announced in Karnataka,Applicable from 10 to 24 Mayd four hours in the morning
कर्नाटकात 27 एप्रिलपासून 10 मे पर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. त्याला कोरोना कर्फ्यु असे नाव दिले होते. तो 14 दिवसांसाठी लागू होता. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सूट दिली होती.
परंतु, त्याचा फारसा परिणाम रुग्णसंख्या कपात होण्यासाठी झाला नाही. उलट ती वाढली. त्यामुळे कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता हा लॉकडाऊन 10 ते 24 मे पर्यंत पहाटे 6 वाजेपर्यत लागू असेल. या चौदा दिवसांच्या काळात हॉटेल, पब, बार बंद राहणार असून खाद्यपदार्थ दुकाने, मटण दुकाने, भाज्यांची विक्री पहाटे 6 ते सकाळी 10 पर्यंत सुरु राहणार आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App