Sharad Pawar : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा अर्थहीन- शरद पवार; बारामतीत वक्तव्य, राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम

Sharad Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीत स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेचा आता कोणताही संबंध उरलेला नाही, असे सांगत त्यांनी या शक्यता थेट उडवून लावल्या.Sharad Pawar

जानेवारी महिन्यात विमान अपघातात निधन झालेले तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गट एकत्र आणण्यावर ठाम होते, असा दावा शरद पवार गटाच्या काही नेत्यांनी यापूर्वी केला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले होते.Sharad Pawar



दिल्लीतील घडामोडीमुळे वाढला होता संभ्रम

जंतरमंतरवर आंदोलकांवर झालेल्या लाठीमारानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.

NCP Merger Rumors Are Meaningless: Sharad Pawar Puts Rest to Speculation in Baramati

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात