वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Chandigarh court कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर, चंदीगडमध्ये पर्यावरणवादी सोनम वांगचुक, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात चंदीगड न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी (CJM) यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत तिघांविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.Chandigarh court
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे वकील विभु वीरभद्र सैनी यांनी २४ जुलै रोजी ही याचिका दाखल केली. ज्यात त्यांनी आरोप केला आहे की, जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलनादरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा यांनी भगवान राम आणि माता सीता यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. यावेळी सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके तिथे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App