Supriya Sule : सुप्रिया सुळेंनी घेतली अमित शहांची भेट; महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ, राष्ट्रवादी शरद पवार गट NDA च्या वाटेवर? चर्चेला उधाण

Supriya Sule

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Supriya Sule गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, त्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. त्यांच्यासोबत खासदार बजरंग सोनवणे देखील उपस्थित होते.Supriya Sule

यापूर्वी खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेटही राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. राज्यात एकीकडे विविध राजकीय घडामोडी आणि आंदोलने सुरू असतानाच ती महत्त्वपूर्ण भेट पार पडली होती. या जुन्या चर्चेचा संदर्भ ताजा असतानाच, आता पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय क्षेत्रात नव्याने चर्चांना उधाण आले आहे.Supriya Sule



समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी सुप्रिया सुळे अमित शहा यांना निमंत्रण देण्यासाठी भेटले असल्याचे बोलले जात आहे. तर बीडच्या कायदा सुव्यवस्थेबाबत खासदार बजरंग सोनवणे यांनी शहा यांना पत्र दिले असल्याचे समजते.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिल्लीतून संदेश

या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना ‘शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सहभागी होणार असून त्यासाठी तयार राहा’ असा संदेश दिल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. ही माहिती खरी ठरल्यास लवकरच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यापूर्वी, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनीही शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे नेत्यांच्या या वाढत्या गाठीभेटी आणि दिल्लीतील घडामोडी पाहता, राज्याच्या राजकारणात भविष्यात कोणते नवे वळण येणार, हे पाहणे आता अत्यंत रंजक ठरणार आहे.

Supriya Sule Meets Amit Shah: Rumors Spark Over NCP (SP) Joining NDA

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात