नाशिक : दिल्लीतल्या जंतर-मंतरवर उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुकचे आंदोलन मोडून काढल्याचे अरविंद केजरीवाल आणि शरद पवार यांना जाम दुःख झाले. अरविंद केजरीवालांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला, तर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारला इशारा दिला.sharad Pawar
पण ज्या शरद पवारांनी पोलिसी बळावर टेल्कोच्या कामगारांचे पुण्यातल्या शनिवार वाड्यावरचे आंदोलन मोडून काढले होते, त्या शरद पवारांना सोनम वांगचुकचे आंदोलन मोडून पडल्याचे दुःख झाल्याने मोठी राजकीय विसंगती समोर आली.
सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून जंतर-मंतरवर उपोषण करत होते. त्यांना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा होता, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लावला नाही. त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. पण दिल्लीच्या हायकोर्टाने त्या आंदोलनाची दखल घेऊन सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घ्या, असे आदेश मोदी सरकारला दिले. त्यामुळे सरकारने सोनम वांगचुक यांना जंतर – मंतर वरून हटवून दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
– नागपुरात गोवारी हत्याकांड
या मुद्द्यावरून शरद पवारांनी मोदी सरकारला इशारा दिला. विद्यार्थ्यांचे आंदोलन थांबणार नाही, असे ते म्हणाले. पण याच शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत नागपूर मध्ये गोवारी हत्याकांड घडले होते. आपल्या हक्कांच्या मागणीसाठी आदिवासी गोवारी समुदायाने नागपूर मधल्या विधिमंडळावर मोर्चा काढला होता. परंतु शरद पवारांच्या सरकारने त्या मोर्चाकडे दुर्लक्ष केले. उलट मोर्चा हिंसक होईल, अशा पद्धतीने कारवाई केली, त्यामुळे गोवारी हत्याकांड घडले. त्याचा परिणाम शरद पवारांना राजकीय दृष्ट्या भोगावा लागला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली 1995 मध्ये काँग्रेस सरकारचा पराभव झाला होता. तेव्हा पहिल्यांदा शिवसेना – भाजप युतीची महाराष्ट्रात सत्ता आली होती.
– टेल्को संप मोडताना पोलीस बळाचा वापर
पण, त्यापूर्वी शरद पवारांनी पुण्यातल्या टेल्को म्हणजे सध्याच्या टाटा मोटर्स कंपनीच्या कामगारांचा संप पोलिसी बळावर मोडून काढला होता. टेल्कोचे कामगार पुण्याच्या शनिवार वाड्यावर आंदोलन करायला बसले होते. टेल्कोचे मॅनेजमेंट कामगारांची मागणी मान्य करायला तयार नव्हते. त्यामुळे संप चिघळला होता. त्यावेळी शरद पवारांनी अचानक पहाटे ४.०० ते ६.०० वाजण्याच्या दरम्यान पोलिसी कारवाई करून टेल्कोच्या कामगारांना शनिवार वाड्याच्या मैदानावरून उचलले होते. त्यांना वेगवेगळ्या बस मध्ये भरून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये पाठविले होते. त्यावेळी टीव्ही चॅनेल्सची भरमार नव्हती. सोशल मीडिया नव्हता. त्यावेळी फक्त वर्तमानपत्रे होती. त्यामुळे रात्री २.०० नंतरच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत नसत. शरद पवारांनी याचाच फायदा घेऊन पहाटे ४.०० ते ६.०० वाजण्याच्या दरम्यान अवघ्या दोन तासांमध्ये पोलिसी बळाचा वापर करून टेल्कोच्या कामगारांचे आंदोलन मोडून काढले होते.
– शरद पवारांना पडला विसर
पण आज मोदी सरकारने दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानुसार सोनम वांगचुक याला जंतर – मंतर वरून हटविले. त्याला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केले, याविषयी मात्र शरद पवारांनी नाराजी व्यक्त करणारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते गोवारी हत्याकांड आणि टेल्को कामगारांचा संप हे आपल्याच कारकिर्दीतले दोन विषय विसरून गेले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App