अमरनाथ यात्रेकरूंनी तोडले रेकॉर्ड; १२ दिवसांमध्ये किती लोकांनी केली यात्रा??; वाचा सविस्तर!!

Amarnath

नाशिक : संपूर्ण देशात आणि प्रदेशात लोकप्रिय असलेल्या अमरनाथ यात्रेत यंदाच्या मोसमात अवघ्या १२ दिवसांमध्ये यात्रेकरूंनी सहभागाचे रेकॉर्ड तोडले. 2026 मध्ये १२ दिवसांपूर्वी अमरनाथची यात्रा सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंत तब्बल तीन लाख लोकांनी अमरनाथ यात्रेत सहभाग घेऊन अमरनाथाचे दर्शन घेतले. जम्मू – काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या संदर्भात अधिकृत ट्विट करून देशवासीयांचे अभिनंदन केले.Amarnath

– अमरनाथ यात्रा हल्ल्यांसाठी चर्चेत

एरवी अमरनाथ यात्रा प्रचंड सुरक्षा व्यवस्था आणि त्यावरचे होणारे हल्ले यामुळे जगभरात चर्चेत असायची. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी कायमच अमरनाथ यात्रेकरूंना टार्गेटवर ठेवले होते. पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या दहशतीमुळे अनेकदा अमरनाथ यात्रा स्थगित करावी लागली होती. अनेक सरकारांनी अमरनाथ यात्रेकरूंना सुरक्षा व्यवस्था पुरवायचे भरपूर प्रयत्न करून झाले, पण त्यामध्ये ती सरकारे पुरेशी यशस्वी ठरू शकली नव्हती. आधीच्या अनेक सरकारांनी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाया केल्या, पण त्या खऱ्या अर्थाने निर्णायक ठरू शकल्या नव्हत्या. त्यामुळे अमरनाथ यात्रा कायमच पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सावटाखाली राहिली.



– अमरनाथ यात्रेकरूंनी तोडले रेकॉर्ड

पण जम्मू – काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर त्या केंद्रशासित प्रदेशातली परिस्थिती पूर्णपणे बदलली. तिथली सुरक्षा व्यवस्था थेट केंद्र सरकारच्या हातात आली आणि केंद्र सरकारने त्यामध्ये अमुलाग्र बदल केला. त्यांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर आणि लामबंध केली. त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांवर मोठा चाप आणि अंकुश बसला. त्याचवेळी दोन्ही सरकारांनी अमरनाथ यात्रेकरूंसाठी अत्याधुनिक व्यवस्था आणि सुविधा सुद्धा निर्माण केल्या. अमरनाथच्या यात्रेकरूंवर त्याचा चांगला परिणाम झाला. अगदी पहलगामचा हल्ला झाल्यानंतर सुद्धा अमरनाथ यात्रेकरूंच्या उत्साहात कमी झाली नाही. उलट उत्साह वाढला. अमरनाथ यात्रेसाठी लाखो यात्रेकरूंनी नोंदणी केल्या. त्यामुळेच गेल्या १२ दिवसांमध्ये अमरनाथ यात्रेकरूंनी त्या यात्रेचे रेकॉर्ड तोडले. तीन लाखांपेक्षा जास्त यात्रेकरू अमरनाथ यात्रेत सहभागी झाले. भारतीयांच्या एकजुटीने पाकिस्तानी लष्करी व्यवस्थेला आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना आपल्या कृतीतून चोख प्रत्युत्तर दिले.

– सुरक्षा व्यवस्था जबरदस्त चोख

यंदाच्या अमरनाथ यात्रेत केंद्र सरकारने डबल एक लाखाहून अधिक सुरक्षाकर्मींना कार्यरत केले. सुरक्षा व्यवस्थेसाठी अत्याधुनिक उपकरणे वापरली. त्यामुळे अमरनाथ यात्रा दहशतवाद्यांच्या सावटाखालून बाहेर आली. अमरनाथ यात्रेकरूंच्या त्याचा सुद्धा चांगला परिणाम झाला. अमरनाथ संख्येत वाढ झाली. जम्मू – काश्मीरच्या सरकारने आणि केंद्र सरकारने या यात्रेकरूंची अन्य व्यवस्था सुद्धा उत्तम केली.

Amarnath pilgrims break record; how many people undertook the pilgrimage in 12 days? Read the details!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात