सुनेत्रा पवारांचे राष्ट्रवादी वरचे नियंत्रण ढिल्ले, की खुंटा हलवून बळकट करण्याचा प्रकार??

नाशिक : महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधूनच आव्हान मिळाल्याचे चित्र आज एकदम समोर आले. हे आव्हान महाराष्ट्रातून मिळाले नसून ते झारखंड मधून मिळाल्याचे उघड झाले. झारखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सच्चिदानंद सिंह यांनी म्हणे, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेणारे पत्र 9 जुलै रोजी पाठविले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली.

– सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला आव्हान

एरवी झारखंडच्या प्रदेशाध्यक्षाकडे कुणाचे लक्षही गेले नसते किंवा त्यांचे नाव सुद्धा महाराष्ट्राच्या वर्तुळात फारसे कोणाला माहिती नव्हते, पण त्यांनी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आणि त्या पदाच्या निवडीवर आक्षेप घेतल्याने त्यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकदम प्रसिद्धीला आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या अंतर्गत संघर्षाला वेगळा फुटवा मिळाल्याचे उघड झाले. कारण एकाच वेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना आव्हान दिले नसले, तरी त्यांच्या नेतृत्वाकडे प्रश्नचिन्ह लावल्याची वातावरण निर्मिती शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी केलीच होती. त्यामध्ये आता सच्चिदानंद सिंह यांच्या पत्रामुळे भर पडली. पण त्याही पलीकडे जाऊन या घटनेमुळे सुनेत्रा पवारांच्या भोवती महाराष्ट्रातल्या नेत्यांचा गोतावळा मोठ्या प्रमाणावर वाढला. राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या नेत्यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर एका पाठोपाठ एक असा विश्वास व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळेच सुनेत्रा पवारांनी राजकीय चतुराई वापरून सच्चिदानंद सिंह यांच्या पत्राचा वापर आपल्या नेतृत्वाचा खुंटा बळकट करण्यासाठी केला की काय??, असा राजकीय संशय निर्माण व्हायला वाव तयार झाला.



– प्रफुल्ल पटेल यांनी नाकारला संबंध

प्रफुल्ल पटेल यांनी सच्चिदानंद सिंह यांच्या पत्राशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला, पण त्यांनी तो खुलासा स्वतःहून न करता ज्यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, त्यावेळी तो खुलासा केला‌. त्यामुळे त्यांच्या खुलाशावर सुद्धा संशय निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवारांची ज्या पद्धतीने “पॉलिटिकल ग्रीप” होती, त्या पद्धतीने सुनेत्रा पवारांची “ग्रीप” सुरुवातीच्याच काळात निर्माण होणे शक्यच नव्हते. तसे अपेक्षितही नव्हते, पण त्याचबरोबर अजित पवारांच्या अकाली एक्झिटच्या सहानुभूतीमुळे सुनेत्रा पवारांच्या विरोधात उघड आवाज उठवण्याची कुणी हिंमत सुद्धा दाखवली नव्हती. पण ती हिंमत महाराष्ट्रातून दाखविणे शक्य नव्हते किंवा शक्य झाले नव्हते, म्हणून मग ती झारखंड सारख्या एखाद्या दुर्गम राज्यातून कुणाला करावीशी वाटली का याविषयी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संशय वाढला.

– नेतृत्व डळमळीत की खुंटा हलवून बळकट??

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार अध्यक्ष असल्या तरी पक्षाची आर्थिक सूत्रे टप्प्याटप्प्याने खासदार पार्थ पवार यांच्याकडे गेली‌. त्यामुळे पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता वाढली. पक्षातली पहिली नेत्यांची फळी कायमच संशयाच्या भोवऱ्यात राहिली. त्यापलीकडे जाऊन झारखंड सारख्या दुर्गम राज्यातून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाला आव्हान निर्माण होईल, अशी “व्यवस्था” निर्माण केली गेली. त्यामुळे सुनेत्रा पवारांचे नेतृत्व डळमळीत झाले, की त्यांच्याभोवती महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विश्वास व्यक्त करून गर्दी केली, त्यामुळे त्यांचे नेतृत्व खुंटा हलवून बळकट झाल्यासारखे झाले??, याविषयी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

Sunetra Pawar’s control over the NCP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात