Corporate Jihad : TCS पाठोपाठ Wipro मध्ये कॉर्पोरेट जिहादचा धक्कादायक प्रकार; हिंदू महिला कर्मचाऱ्यावर धर्मांतरासाठी दबाव; आरोपी मोहम्मद सादिकला अटक!!

विशेष प्रतिनिधी

पुणे :  नाशिक मधल्या TCS कंपनीतील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातही कॉर्पोरेट जिहादचे भीषण वास्तव समोर आले आहे. पुण्यातील नामांकित विप्रो (Wipro) कंपनीत काम करणाऱ्या एका हिंदू महिला कर्मचाऱ्याचा धार्मिक छळ करून, तिच्यावर बळजबरीने धर्मांतरासाठी दबाव आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सादिक याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

– काय आहे नेमके प्रकरण?

हिंजवडी आयटी पार्क येथील विप्रो कंपनीत कार्यरत असलेल्या एका हिंदू महिला कर्मचाऱ्याने तिच्याच सोबत काम करणाऱ्या मोहम्मद सादिक या सहकाऱ्यावर गंभीर आरोप केले. मोहम्मद सादिक हा गेल्या काही काळापासून या महिलेचा मानसिक आणि धार्मिक छळ करत होता, तसेच तिच्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी सातत्याने बळजबरी करत होता. या जाचाला कंटाळून अखेर पीडित महिला कर्मचाऱ्याने पोलिसांत धाव घेतली. या महिलेच्या तक्रारीनंतर हिंजवडी पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत आरोपी मोहम्मद सादिक याला अटक केली.



– हिंदू जनजागृती समितीची पत्रकार परिषद

विप्रो कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाची गंभीर दखल घेत हिंदू जनजागृती समितीने पुण्यात तातडीने पत्रकार परिषद आयोजित केली. आयटी क्षेत्रासारख्या उच्चशिक्षित आणि कॉर्पोरेट वर्तुळात अशा प्रकारे कारस्थान रचून हिंदू महिलांना टार्गेट केले जात असल्याबद्दल समितीने तीव्र चिंता व्यक्त केली. विप्रो कंपनीतला हा प्रकार म्हणजे कॉर्पोरेट जिहादचाच एक भाग असून, अशा प्रवृत्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी समितीने केली.

Corporate Jihad : Following TCS, a Shocking Incident of ‘Corporate Jihad’ at Wipro

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात