पवार + ठाकरे + ममतांच्या डोक्यात भरली होती पंतप्रधान पदाची हवा; पण त्यांना टिचभर प्रादेशिक पक्ष टिकवता येईनात!!

Mamata Banerjee

नाशिक : पवार + ठाकरे + ममता यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांच्या डोक्यात भरली होती पंतप्रधान पदाची हवा; पण त्यांना टिचभर प्रादेशिक पक्ष टिकवता येईनात!!, हेच राजकीय वास्तव पश्चिम बंगाल मधून आज समोर आले.Sharad Pawar, Uddav Thackeray and Mamta Banerjee failed to sustain their own parties

– तृणमूळ काँग्रेसमध्ये फूट

एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्यात त्यांच्या समर्थकांनी पंतप्रधान पदाची हवा भरली होती. ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल जिंकणार आणि त्या पाठोपाठ केंद्रीय राजकारणावर स्वार होणार आणि नंतर पंतप्रधान सुद्धा बनणार, असे त्यांच्या तृणमूळ कॉंग्रेसचे नेते म्हणत होते. पण प्रत्यक्षात ममता बॅनर्जी पश्चिम बंगालची निवडणूक हरल्या आणि त्यांना तृणमूळ काँग्रेस सुद्धा टिकवता येईना अशी स्थिती निर्माण झाली. कारण त्यांच्या तृणमूळ काँग्रेस नावाच्या पक्षातून तब्बल 50 आमदारांनी बंडखोरी करून स्वतंत्र राजकीय वाट चोखाळायला सुरुवात केली. इतकेच नाही तर त्यांनी आपणच मुळात तृणमूळ काँग्रेस आहोत, असा दावाही करायला सुरुवात केली.



 

– मराठी माध्यमांचे अर्धवट भाकीत

त्यामुळेच पश्चिम बंगाल मध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाची पुनरावृत्ती होणार अशी चर्चा माध्यमांनी सुरू केली. जे ठाकरे आणि पवारांच्या नशिबी आले तेच ममता बॅनर्जींच्या नशिबात येणार, असे भाकीत करायला सुरुवात केली. पण मराठी माध्यमांचे हे भाकीत नेहमीप्रमाणेच अर्धवट ठरले. त्यांनी ठाकरे, पवार आणि ममता यांच्यातला समान धागा फक्त पक्ष फुटण्यापुरता गृहीत धरला त्या पलीकडे जाऊन या तिन्ही नेत्यांच्या खऱ्या कर्तृत्वाची माहिती किंवा विश्लेषण त्यांनी सादर केले नाही. त्यामुळेच मराठी माध्यमांचे दावे अर्धवट ठरले.

– पवारांच्या डोक्यात पंतप्रधान पदाची हवा

मुळात ममता बॅनर्जींच्या डोक्यात पंतप्रधान पदाची हवा फार नंतर गेली होती त्याआधी शरद पवारांच्या डोक्यात पंतप्रधान पदाची हवा फार आधी भरली होती. अगदी 1991 पासून त्यांना आपण पंतप्रधान होणार असल्याचा भास झाला होता. तो भास त्यांच्या अनुयायांनी कायम ठेवला होता. त्यामुळे पवारांनी महाराष्ट्रात कितीही मोठे यश मिळवो किंवा अपयश मिळवो, पवारांचे अनुयायी आणि मराठी माध्यमे शरद पवारांचे वर्णन “राष्ट्रीय नेते”, “पंतप्रधान पदाचे उमेदवार” किंवा “राष्ट्रपतीपदाचे उमेदवार” अशाच शब्दांनी करत होती, पण प्रत्यक्षात शरद पवार हे प्रादेशिक नेतेच राहिले. पवारांना आपल्या पुतण्याच्या हाती स्वतःच स्थापन केलेला पक्ष गमवावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसची शकले झालेली पाहावी लागली आणि त्या पलीकडे जाऊन सुनेच्या पक्षात सुद्धा धड विलीनीकरण करता न येण्याची स्थिती उत्पन्न झाली. हे सगळे पवारांच्या डोळ्यादेखत घडून आले. एकेकाळी पंतप्रधान पदाला गवसणी घालणारे पवार स्वतःच्या पक्ष टिकवून धरण्यात सुद्धा अपयशी ठरले.

– ठाकरे सुद्धा ठरले नाहीत अपवाद

उद्धव ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा हेच झाले. उद्धव ठाकरे यांच्या अनुयायांनी त्यांच्या डोक्यात यशस्वी मुख्यमंत्री पदाची हवा भरली. त्या पाठोपाठ पंतप्रधान पदाची हवा भरली होती. स्वतः उद्धव ठाकरेंनी तशी महत्त्वाकांक्षा करी जाहीर केली नव्हती, हे खरे पण अनुयायांना सुद्धा त्यांनी गप्प केले नव्हते, हेही तेवढेच खरे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा जाऊन चिकटली.

पण त्याच उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आपल्याकडे टिकवून धरता आली नाही. शरद पवार आणि काँग्रेस या दोन पक्षांनी उद्धव ठाकरेंची एवढी फरफट केली की त्यांना राजकीय हिंदुत्व सुद्धा गमवावे लागले. त्यामुळे त्यांचा पक्ष फुटला आणि बाळासाहेब ठाकरे यांचा खरा हिंदुत्वाचा राजकीय वारसा एकनाथ शिंदे घेऊन गेले.

– हिंदूंच्या द्वेषामुळे ममतांचा पक्ष मातीत

ममता बॅनर्जींच्या संदर्भात सुद्धा नेमके हेच घडून आले. त्यांनी भाजपच्या द्वेषाचे टोक हिंदूंच्या द्वेषापर्यंत जाऊन भिडवले. त्यामुळे त्यांना पश्चिम बंगाल मध्ये पराभव पत्करावा लागला. पश्चिम बंगालमधल्या हिंदूंनी ममता बॅनर्जींचा पराभव केला. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्त्वाकांक्षावर तर पाणी फेरलेच. पण त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री सुद्धा उरल्या नाहीत. त्यामुळेच त्यांच्या तृणमूळ काँग्रेस मधले सगळे अवगुण बाहेर आले. त्यांच्याच एकेकाच्या अनुयायांनी बाहेर आणले आणि त्या अनुयायांनी स्वतंत्र राजकीय मार्ग चोखाळायला सुरुवात केली. आपणच स्थापन केलेली तृणमूळ काँग्रेस अखंड ठेवण्याची क्षमता ममता बॅनर्जी यांच्याकडे उरली नाही.

Sharad Pawar, Uddav Thackeray and Mamta Banerjee failed to sustain their own parties

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात