पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंची सेफसाईड माघार; विधान परिषद उमेदवारीवरून संजय शिरसाटांचा टोला

Sanjay Shirsat

विशेष प्रतिनिधी

मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर बोचरी टीका केली. “उद्धव ठाकरेंना पराभवाची भीती आहे, तसेच त्यांच्या पक्षातील लोकच त्यांना संपवण्यासाठी तयार आहेत, हे ठाऊक असल्याने त्यांनी ‘सेफसाईड’ म्हणून माघार घेतली,” असे शिरसाट यांनी म्हटले आहे. तसेच मराठीचा पुळका फक्त एका पक्षालाच आहे आणि बाकी आम्ही हिंदी भाषिक आहोत, असे म्हणत संजय शिरसाट यांनी नाव न घेता मनसेवर टीका केली.



विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे उमेदवार असावेत, अशी महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतली होती. उद्धव ठाकरे उमेदवार असतील, आम्ही पाठिंबा देऊ असे काँग्रेसने सांगितले होते. मात्र, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करत, निवडणुकीतून अलिप्त राहणे पसंत केले. यावरून आता संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नेमके काय म्हणाले संजय शिरसाट?

उबाठा संपवण्यासाठी त्यांच्या पक्षातील लोकच तयार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे हे सेफसाईड म्हणून निवडणुकीतून बाहेर पडले, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला. महाविकास आघाडीत कधीच एकवाक्यता नव्हती. काँग्रेसने स्पष्ट केले होते की उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच आम्ही तडजोड करू. मात्र, उमेदवार जाहीर होईपर्यंत काँग्रेसला साधी सूचनाही दिली गेली नाही. काँग्रेसचा अपमान करण्याचे काम ‘उबाठा’ गटाने केले आहे. आपला हट्ट सोडायचा नाही या भूमिकेमुळे काँग्रेस आता स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे, असे संजय शिरसाट म्हणालेत.

Sanjay Shirsat takes a dig over Legislative Council candidature.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात