Ashok Kharat : भोंदू खरातचे व्हिडिओ व्हायरल करणे पडले महागात; तिघांवर गुन्हा दाखल, पोलिसांचा ग्रुप ॲडमिन आणि नेटकऱ्यांना कडक इशारा

Ashok Kharat

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Ashok Kharat  नाशिकचा कथित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखे पसरल्यानंतर आता पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तांत्रिक विधीच्या नावाखाली विवाहित महिला आणि तरुणींचे शोषण करणाऱ्या खरातच्या या कृत्यांचे व्हिडिओ व्हायरल करून पीडितांची ओळख उघड केल्याप्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोपरगाव आणि बीडमधील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.Ashok Kharat

अशोक खरातच्या अश्लील चित्रफिती व्हायरल झाल्याने पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी होत आहे. कायद्यानुसार लैंगिक शोषणातील पीडितेची ओळख उघड करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरीही काही व्यक्तींकडून हे व्हिडिओ सातत्याने फॉरवर्ड केले जात होते. याची गंभीर दखल घेत अहिल्यानगर पोलिसांनी कोपरगावमधील राहुल शिंदे, योगेश आढाव आणि बीडमधील संदीप गरजे या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२), ३ (५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.Ashok Kharat



 

व्हिडिओ शेअर करणाऱ्यांची ‘साखळी’

पोलिस तपासात या व्हिडिओ व्हायरल करण्याची एक साखळीच उघडकीस आली आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील संदीप गरजे याने हे व्हिडिओ योगेश आढावला पाठवले होते, तर योगेशने ते कोपरगावच्या राहुल शिंदेला दिले. या साखळीचा तपास करत पोलिस आता या व्हिडिओचा उगम नेमका कोठून झाला आणि ते समाजमाध्यमांवर सर्वप्रथम कोणी आणले, याचा शोध घेत आहेत.

नेटीझन्स आणि ग्रुप ॲडमिनना कडक इशारा

हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस प्रशासनाने जनतेला आणि विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनना गंभीर इशारा दिला आहे. “कोणाकडेही पीडित महिला, तिचे नातेवाईक किंवा तिच्या घराची ओळख उघड होईल असे व्हिडिओ असल्यास ते तातडीने डिलीट करावेत. असे व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारीत करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो. अशा पोस्ट फॉरवर्ड झाल्यास केवळ संबंधित व्यक्तीच नव्हे, तर ग्रुप ॲडमिनवरही कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक केली जाईल,” असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

गुन्ह्याचे स्वरूप आणि गांभीर्य

अशोक खरातने अघोरी पूजेच्या नावाखाली अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे. मात्र, त्याचे गुन्हे उघड करण्याच्या नादात पीडित महिलांचे चारित्र्यहनन होणार नाही, याची काळजी घेणे ही समाजाची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. याच हेतूने पोलिसांनी आता तांत्रिक तपासाच्या आधारे अशा व्हिडिओंच्या प्रसारावर बंदी घालण्यासाठी पावले उचलली आहेत.

FIR Filed for Sharing Ashok Kharat Videos; Police Warn Group Admins & Netizens

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात