Rohit Pawar : महिलेची तक्रार असल्यास झिरवाळांना सोडायचे नाही, रोहित पवारांचा थेट इशारा; सुनील तटकरेंवर निशाणा

Rohit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Rohit Pawar   नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सुरू असतानाच आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचाही एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सावध भूमिका मांडली असून, व्हिडिओतील सर्व व्यक्ती सज्ञान असल्याने आणि कोणाची तक्रार नसल्यास यावर राजकीय भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, संबंधित महिलेची काही तक्रार असल्यास नरहरी झिरवाळ यांना सोडायचे नाही, असा स्पष्ट इशाराही पवार यांनी यावेळी दिला आहे.Rohit Pawar

आमदार रोहित पवार म्हणाले, झिरवाळ यांच्या बंगल्यावरील व्हिडिओमध्ये जे काही लोक दिसत आहेत, त्यांचे वय नक्कीच 18-19 च्या पुढे आहे. त्याच्यामध्ये त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे की नाही ते पाहावे लागेल. पोलिसांकडे जर तक्रार दिली असेल तर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे. वयाने जास्त असणाऱ्या लोकांमध्ये जे काही व्यक्तिगत संबंध आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून ते लोकांसमोर आले असले तरी महिलेची तक्रार नसेल तर यावर राजकीय बोलणे अवघड जात आहे. मात्र, महिलेने जर कंप्लेंट केली असेल तर झिरवळ साहेबांना सोडायचे नाही, असा इशाराच पवारांनी दिला आहे.Rohit Pawar



सुनील तटकरेंवर टीका

पुढे बोलताना रोहित पवारांनी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, तटकरे म्हणाले मी महाविकास आघाडीच्या बैठकीला नव्हतो. अहो तुमचा नेता आणि माझा काकाच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी 1200 किमी दूर कर्नाटकात होतो. तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, जयंत पाटील आणि माझ्यात जो विषय आहे तो आमच्या पक्षाचा विषय आहे. इथे मी लढत आहे माझ्या काकासाठी कारण मला ते चिरंजीव म्हणायचे. तुम्ही त्यांना किती त्रास दिला हे जगजाहीर आहे. तुमच्या पार्लरची, हेलिकॉप्टरची बिले, हॉटेलची बिले पक्षाच्या खर्चात जोडत होतात. आता त्यांच्या पक्षाच्या खात्याची माहिती घेतली तर लक्षात येईल पुरेसे पैसे खात्यात नाहीत, असे म्हणत पवारांनी तटकरेंवर टीका केली आहे.

मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास

रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री यांनी सभागृहात भाषण केले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, जर काही असेल तर आरोपीला खोदून काढू. मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणाले टेक्निकली कर्नाटकात गुन्हा दाखल होऊन उपयोग नाही, त्यासाठी व्हिक्टिम असायला हवा. आता व्हिक्टिम स्वतः अजित पवार आणि ते कसे काय गुन्हा दाखल करणार, कुटुंब म्हणून मी गुन्हा दाखल केला आहे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

“Don’t Spare Zirwal if Victim Complains”: Rohit Pawar on Viral Video Scandal

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात