विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar Plane Crash उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला महिना पूर्ण होत असतानाच, हवाई उड्डाण मंत्रालयाच्या ‘एएआयबी’ (AAIB) तपास यंत्रणेने या घटनेचा २२ पानांचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला आहे. विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी ते एका झाडाला धडकले होते, अशी माहिती या अहवालातून समोर आली आहे. या प्राथमिक अहवालात अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी, अपघाताला कारणीभूत ठरू शकणाऱ्या अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवण्यात आले आहे.Ajit Pawar Plane Crash
गत २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. जवळपास एक महिन्यानंतर डीजीसीएकडून या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.Ajit Pawar Plane Crash
नेमका अपघात कसा घडला?
अहवालानुसार, मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या या व्हीआयपी (VIP) फ्लाईटने रनवे ११ वर लँडिंगचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला लँडिंग करता आले नाही, त्यामुळे त्यांनी ‘गो-अराउंड’ (Go-Around) केला. दुसऱ्या प्रयत्नात पायलटने “Field in sight” असा संदेश दिला. परंतु, एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) त्यावेळी ३ किलोमीटर इतकी दृश्यमानता (Visibility) नोंदवली होती, जी ‘व्हीएफआर’ (व्हिज्युअल फ्लाईट रूल्स) नियमांनुसार आवश्यक असलेल्या ५ किलोमीटरपेक्षा खूपच कमी होती. लँडिंग क्लिअरन्स मिळाल्यानंतर काही क्षणांतच विमान रनवेच्या डावीकडे ५० मीटर अंतरावर असलेल्या झाडांवर आदळले आणि त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत विमान जळून खाक झाले.
अहवालातील धक्कादायक निष्कर्ष:
प्राथमिक अहवालातून बारामती विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत:
सुरक्षा त्रुटी: बारामती हे ‘अनकंट्रोल्ड एअरफिल्ड’ असून तिथे नियमित एटीसी सुविधा नाही. रनवेवर बारीक खडी (Loose Gravels) आढळली असून, रनवेला परिपूर्ण कुंपण (Boundary Wall) नाही.
हवामानाचा अंदाज: बारामतीमध्ये अधिकृत ‘मेट’ (MET) सुविधा उपलब्ध नाही. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके (Shallow Fog) होते, तरीही लँडिंगचा प्रयत्न झाला.
नेव्हिगेशन अभाव: विमानतळावरील रनवे मार्किंग स्पष्ट नसल्यामुळे वैमानिकांना लँडिंगमध्ये अडचणी आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
अमेरिकन कंपनीची मदत घेणार
विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपीट मधील संभाषण (CVR) तपासण्यासाठी आता ज्या अमेरिकन कंपनीने ही यंत्रणा बनवली आहे, त्यांची मदत घेतली जाणार आहे. या यंत्रणेतील ‘रॉ डेटा’ सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अमेरिकेतून तज्ज्ञांची एक विशेष टीम भारतात येणार आहे. त्यानंतरच वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) मधील शेवटच्या क्षणांचे संभाषण समोर येऊ शकेल.
वैमानिकांना बारामती विमानतळाची होती माहिती
अपघाताच्या वेळी विमानाचे नेतृत्व करणाऱ्या कॅप्टन सुमित कपूर यांना १८ हजार ८५५ तासांचा मोठा अनुभव होता, तर फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक हिलाही २ हजार ४९० तासांचा अनुभव होता. दोघांनाही बारामती विमानतळाची माहिती होती. या अपघातानंतर डीजीसीएने आता कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
अंतिम अहवालाकडे लक्ष
सध्या प्रसिद्ध झालेला अहवाल केवळ प्राथमिक स्वरूपाचा आहे. यामध्ये ब्लॅक बॉक्समधील तांत्रिक विश्लेषणाचा समावेश नाही. तपास यंत्रणांनी विमानाचा रॉ डेटा डाऊनलोड केला असून त्याचे बारकाईने विश्लेषण सुरू आहे. या प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने अपघाताचे नेमके कारण स्पष्ट करणारा अंतिम अहवाल येण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App