कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा द्यायचा, तर महाविकास आघाडी साताऱ्यात उदयनराजेंना बिनविरोध निवडून देईल का??

Will Mahavikas Aghadi elect Udayanraj unopposed in Satara?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने एकमुखाने पाठिंबा देत छत्रपती शाहू महाराजांची काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर केली, मात्र त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबाचा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीलाच एक प्रतिप्रश्न करून पेचात पकडले. Will Mahavikas Aghadi elect Udayanraj unopposed in Satara?

कोल्हापुरातून जर शाहू महाराजांना महायुतीने पाठिंबा देऊन त्यांची बिनविरोध निवड केली, तर महाविकास आघाडी सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांच्या विरोधात उमेदवार उभा न करता त्यांना बिनविरोध निवडून देणार का??, असा सवाल फडणवीस यांनी केला. उदयनराजे यांच्या उमेदवारी बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह योग्य तो निर्णय घेतील अशी पुस्तीही त्यांनी जोडली. छत्रपतींच्या राजघराण्यातून अनेकांनी निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये अशा स्वरूपाने निवडणुकीच्या मैदानात त्यांचे घराणे उतरणे हे काही नवीन नाही, असे फडणवीस म्हणाले.

मनसे प्रमुख राज ठाकरे आपला पक्ष शिवसेनेत विलीन करतील, अशी चर्चा महाराष्ट्राचा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र त्यावरून प्रश्न विचारल्यावर आपण शिवसेना किंवा मनसे यांचा प्रवक्ता नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Will Mahavikas Aghadi elect Udayanraj unopposed in Satara?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात