शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन

राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शोक व्यक्त


विशेष प्रतिनिधी

सांगली : शिवेसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज वयाच्या ७४ व्या वर्षी अकस्मिक निधन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि जवळचे म्हणून अनिल बाबर यांची ओळख होती. सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते.Shivsena MLA Anil Babar passed away



राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा अनिल बाबर यांनी २०१९च्या निवडणुकीत पराभव केला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीत, काँग्रेस-शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास होता. सलग चारेवळा ते आमदार म्हणून निवडून ले होते. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना न्यूमोनिया झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

अनिल बाबर यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे.’ अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

Shivsena MLA Anil Babar passed away

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात