हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरला; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांना केला फोन अन्…

Pakistan panics after airstrikes Called the foreign minister of Iran

इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले होते.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : इराणने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेले हवाई हल्ले आणि त्यानंतर इस्लामाबादच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांतील संबंधांतील ही कटुता संपवण्यासाठी आता पाकिस्तानचा सूर बदलल्याचे दिसत आहे. Pakistan panics after airstrikes Called the foreign minister of Iran

पाकिस्तानने इराणसोबत सर्व मुद्द्यांवर एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी यांनी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांशी केलेल्या दूरध्वनीवरून त्यांच्या भूमिकेत नरमाई येण्याची चिन्हे दिसून आली.


Pakistan Bomb Blast : बॉम्बस्फोटांनी हादरले पाकिस्तान, काही तासांतच दोन आत्मघातकी हल्ल्यात ६० ठार


पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परराष्ट्र मंत्री जिलानी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लायान यांच्याशी फोनवर चर्चा केली. परराष्ट्रमंत्र्यांनी परस्पर विश्वास आणि सुरक्षा सहकार्याच्या आधारावर इराणसोबत सर्व आघाड्यांवर काम करण्याची तयारी दर्शवल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला इराणने क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले होते. पाकिस्तानच्या सीमेवरून हल्ला करणाऱ्या जैश-अल-अदल या दहशतवादी गटाला आपला जुना शत्रू सौदी अरेबिया पाठिंबा देत असल्याचा इराणला संशय होता.

Pakistan panics after airstrikes Called the foreign minister of Iran

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात