बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला लागली गळती, तिकिट विकल्याचा आरोप करत प्रदेशाध्यक्षांचा मुलगाच संयुक्त जनता दलात

विशेष प्रतिनिधी

पाटणा : गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, लालूप्रसाद यादव यांच्या घरातीलच कलह आणि पैसे घेऊन तिकिटे विकली जाण्याचे प्रकार यामुळे राष्ट्रीय जनता दलाला गळती लागली आहे. पक्षाचे सर्वेसर्वो बनलेले तेजस्वी यादव यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीला कंटाळून राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांचा मुलगा अजित सिंह याने पक्षत्याग केला. त्यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे.In Bihar the Rashtriya Janata Dal (RJD) state president’s son accuses of selling tickets.

जगदानंद सिंह यांनाही जदयूमध्ये येण्याचे आवाहन अजित सिंह यांनी केले आहे. जगदानंद सिंह यांनाही पक्षात सततअपमानित व्हावे लागते आहे. तरीही ते त्या पक्षात का थांबले आहेत असा सवाल त्यांनी केला आहे.
अजित सिंह म्हणाले, राष्ट्रीय जनता दलात पैशावर तिकीट विकले जाते.



निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान केला जात नाही. जगदानंद सिंह व दिवंगत नेते रघुवंश प्रसाद यांनी आपल्याला दुर्लक्षित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. मी बालपणापासून नितीशकुमार यांच्या राजकारणाने प्रभावित आहे. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळेल.

त्यामुळेच मी विनाशर्त जदयूमध्ये सहभागी झालो, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय जनता दलामध्ये तेजस्वी यादव यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर पक्षात नाराजी आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षत्याग करत आहेत.

In Bihar the Rashtriya Janata Dal (RJD) state president’s son accuses of selling tickets.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात