प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपने 275 जागा मिळवत प्रचंड बहुमताने सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केली असताना राज्यात नवनव्या घोषणा दिल्या जात आहेत. बुलडोजर बाबा आये है!!… मशीन वही तकनीक नई…!! अशा या घोषणा आहेत.UP Assembly Election Result
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी बुलडोजर चालवून माफियागिरी अक्षरश: मोडून काढली. परंतु, ते काम पाच वर्षात पूर्ण झालेले नाही. अजून काही काम बाकी आहे. त्यामुळे त्यांनी आपली बुलडोजर बाबा ही प्रतिमा कायम ठेवत आम्हाला अजून माफियागिरीची सफाई करण्यासाठी संधी द्या, असा प्रचार केला होता. राज्यातल्या जनतेने हा प्रचार स्वीकारून योगी आदित्यनाथ यांना पुन्हा एकदा संधी दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोजर बाबा आये है!!, मशीन वही तकनिक नई…!! अशा स्वरूपाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली आहे.
मात्र, फक्त बुलडोजर बाबाची जादू चालली असे नाही तर विकासाच्या विविध मुद्द्यांवर योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने साकारला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App