कॉँग्रेस नेत्यांना झालेय तरी काय? आता राशीद अल्वी म्हणाले जय श्रीरामाची घोषणा देणार सगळे मुनी नाहीत तर राक्षस आहेत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिंदू धर्मीयांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्याची कॉँग्रेस नेत्यांनी मालिकाच सुरू केली आहे. सलाम खुर्शीद यांनी हिंदूत्वाची तुलना आयसीस आणि बोकोहरम या दहशतवादी संघटनांशी केल्यानंतर आता राशीद अल्वी म्हणाले आहेत की जय श्रीरामाची घोषणा देणारे सगळेच मुनी नाहीत तर राक्षस आहेत.What happened to the Congress leaders? Now Rashid Alvi said that not everyone who announces Jai Shri Rama is a sage but a demon

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील हिंदुत्वाचं विश्लेषण वादात सापडले असताना आता राशीद अल्वी यांनी एका जाहीर कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले आहे. जय श्री रामची घोषणा देणारे सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला असून भाजपाकडून यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे. सलमान खुर्शीद आणि राशीद अल्वी यांच्या विधानांमुळे काँग्रेस पक्षावरही टीकेची झोड उठली आहे.



भाजपा नेते अमित मालवीय यांनी राशीद अल्वी यांच्या या विधानाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये राशीद अल्वी जय श्री रामची घोषणा करणाऱ्यांविषयी मत मांडताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत की, जे जय श्रीरामची घोषणा देतात, ते सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे.

राशिद अल्वी यांचा व्हिडीओ पोस्ट करताना अमित मालवीय यांनी म्हटले आहे की, सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राशिद अल्वी जय श्रीराम म्हणणाºयांना निशाचर (राक्षस) म्हणत आहेत. राम भक्तांच्या बद्दल काँग्रेसच्या विचारांमध्ये किती विष मिसळले आह.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा याबाबत म्हणाले, रामावरून राजकारण केलं जाऊ नये. रामाच्या अनुयायांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. लोक याचे सडेतोड उत्तर देतील. रामभक्तांविषयी केलेली अशी विधानं चुकीची आहेत.

What happened to the Congress leaders? Now Rashid Alvi said that not everyone who announces Jai Shri Rama is a sage but a demon

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात