हैद्राबाद महापालिकेत उज्वल यश मिळविल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन मुंबई सुरू केले आहे. मुंबई महापालिकेवर भगवा फडकाविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. hyderbad bjp mission mumbai leader bjp
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हैद्राबाद महापालिकेत उज्वल यश मिळविल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने मिशन मुंबई सुरू केले आहे. मुंबई महापालिकेवर भगवा फडकाविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. hyderbad bjp mission mumbai leader bjp
भाजपाचे नेते राम कदम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं बिहारमध्ये विजय मिळवला. त्यानंतर भाजपला हैदराबादमध्ये ज्या प्रकारचं यश मिळालं त्यावर देशातील जनतेला पंतप्रधानांच्या नेतृत्वावर किती विश्वास आहे हे दिसून येतंय. लोकांनी विकासाला स्वीकारलं आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचाच भगवा फडकणार.
hyderbad bjp mission mumbai leader bjp
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेला महापालिका निवडणुकीत मात देण्यासाठी भाजपनं मिशन मुंबई मोहिम हाती घेतली आहे. हैदराबाद प्रमाणेच मुंबईतही जनतेचा कल भाजपसोबत असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पराभवानंतरही फडणवीस, पाटलांचे आघाडीलाच सल्ले आणि आव्हान
शिवसेनेच्या ३० वर्षांच्या भ्रष्टाचाराला जनता कंटाळली आहे. कोरोना काळातही जो निष्काळजीपणा करण्यात आला तो लोकांच्याही लक्षात आहे. आम्हाला विश्वास आहे मुंबई पालिकेवर भाजपचाच भगवा फडकणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.