• Download App
    महाराष्ट्र बंद : सोलापुरात युवासेना आक्रमक ; रस्त्यावर टायर जाळून केली बंदची सुरुवात , पहा व्हिडिओMaharashtra Band : Yuvasena aggressive in Solapur; The road started with burning tires, watch the video

    महाराष्ट्र बंद : सोलापुरात युवासेना आक्रमक ; रस्त्यावर टायर जाळून केली बंदची सुरुवात , पहा व्हिडिओ

    माळशिरस तालुक्याच्या संगम येथे युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात झाली.Maharashtra Bandh: Yuvasena aggressive in Solapur; The road started with burning tires, watch the video


    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडी सरकार राज्य आणि देशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगण्यात आलं.तसेच या बंदमध्ये राज्यभरातील कार्यकर्त्यांनी आणि जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

    दरम्यान सोलापूरात युवा सेनेच्यावतीनं संगम येथे टायर जाळून महाराष्ट्र बंदची सुरुवात झाली आहे. माळशिरस तालुक्याच्या संगम येथे युवा सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे.

    या आंदोलनात सहभागी होऊन रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात झाली.यावेळी “केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्री यांचा निषेध करत राजीनामा द्यावा ,भारतीय शेतकरी जिंदाबाद” अशा घोषणा देण्यात आल्या. युवा सेना तालुका प्रमुख गणेश इंगळे शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी समर्थनार्थ महाराष्ट्र बंद आंदोलन सुरु आहे.

    हा निषेध सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या संगम या ठिकाणी करण्यात आला.

    Maharashtra Band : Yuvasena aggressive in Solapur; The road started with burning tires, watch the video

    महत्त्वाच्या बातम्या

    आज राज्यात महाराष्ट्र बंद ची हाक ; महविकास आघाडीची जोरदार तयारी , या सेवांवर होणार ‘बंद’ चा परिणाम

    विज्ञानाची गुपिते : चुंबकीय लहरींमुळे सौरडागांवरील प्रभामंडळ उष्ण

    विज्ञानाचे डेस्टीनेशन :कोरोनाविरोधात दोन प्रतिपिंडांचा प्रयोग प्रभावी

     

    Related posts

    Bajrang Dal : उमरखेडमध्ये बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

    BHAVY Yojana : केंद्र सरकारने भव्य योजना सुरू केली; देशभरात 100 औद्योगिक उद्याने तयार केली जातील; ₹33,660 कोटींचे बजेट मंजूर

    योगींचा कायद्याचा बडगा; उत्तर प्रदेशात बकरी ईदच्या कुर्बानीला सार्वजनिक ठिकाणी बंदी; रस्त्यावरचे नमाज पठण बंद म्हणजे बंद!!