12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये अजितदादांच्या एक्झिटच्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला; शिंदे सेनेला मागे सारून दोन नंबरचे स्थान!!

Zila Parishad

विशेष प्रतिनिधी

नाशिक : जिल्हा परिषद निवडणुकांच्या पहिल्या कलांमध्ये तरी अजित दादांच्या अकाली एक्झिटच्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला झाल्याचे दिसून आले असून राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सेनेला मागे सारे राज्यात दुसऱ्या नंबरचे स्थान मिळवल्याचे दिसून येत आहे.

12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतल्या मतमोजणीच्या पहिल्या पदांच्या आकडेवारीनुसार भाजपने 132 जागांवर आघाडी मिळवली असून अजित पवारांचे राष्ट्रवादी 80, एकनाथ शिंदे यांची शिवसेना 74, काँग्रेस 27, ठाकरे सेना 19, शरद पवारांची राष्ट्रवादी 6, आणि इतरांना 19 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे.

अर्थातच अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा लाभ पहिल्या टप्प्यात तरी राष्ट्रवादी काँग्रेसला झालेला दिसत असून महापालिका निवडणूक असल्या निकालांपेक्षा तो वेगळा आहे. महापालिका निवडणुकांच्या निकालात भाजप एक नंबर वर एकनाथ शिंदे यांची शिवसेना दोन नंबर वर काँग्रेस तीन नंबरवर तर अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस चार नंबर वर अशी राजकीय परिस्थिती होती. पण अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला मिळाला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळून निदान 12 जिल्हा परिषदांमध्ये तरी अजित पवारांचे राष्ट्रवादी दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरली आहे पण अजित पवारांच्या अकाली एक्झिट चा कुठलाही फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्याचे दिसत नाही शरद पवारांचे राष्ट्रवादी फक्त तीन जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.

Zila Parishad Election result Count

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात