• Download App
    प. बंगाल, ओडिशाच्या पूर्व किनाऱ्याला आता 'यास' वादळाचा धोका... हवामान विभागाचा इशारा।Yas cyclone will hit west Bengal, odisha

    प. बंगाल, ओडिशाच्या पूर्व किनाऱ्याला आता ‘यास’ वादळाचा धोका… हवामान विभागाचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : तौक्ते या चक्रीवादळाचा जोर ओसरत नाही तोच हवामान खात्याने आता पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ हे चक्रीवादळ धडकेल असा इशारा दिला आहे. येत्या २३ ते २५ मे दरम्यान पश्चिम बंगाल, ओडिशाला या वादळाचा फटका बसू शकतो. Yas cyclone will hit west Bengal, odisha

    या वादळाला ‘यास’ हे नाव ओमानने दिले आहे. ‘यास’ ची दिशा आणि वेग अद्याप स्पष्ट नसला तरी मागील वर्षी आलेल्या अम्फान चक्रीवादळाप्रमाणे नव्या वादळाचा जोर असू शकतो, असा अंदाज आहे. अम्फान चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाला मोठा तडाखा बसला होता.



    हवामान खात्याने या वादळाचा अंदाज व्यक्त करताना म्हटले आहे, की ‘‘ दक्षिण अंदमान सागर आणि लागून असलेल्या बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात नैर्ऋत्य मॉन्सून प्रगतीपथावर असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. समुद्रात या वादळाचा वेग ताशी ३.१ ते ५.८ किलोमीटर एवढा राहील.

    Yas cyclone will hit west Bengal, odisha

    Related posts

    यंदा खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी अन् खर्गे काँग्रेसला मतदान करणार नाहीत – आचार्य प्रमोद कृष्णम

    आजोबांशी उभा दावा, नातवाबरोबर घ्यावी लागली सभा; चाणक्यांवर उलटली त्यांच्याच राजकारणाची तऱ्हा!!

    प्रिन्स हॅरी यांनी अधिकृतपणे ब्रिटन सोडले; ब्रिटनऐवजी लिहिला कॅलिफोर्नियाचा पत्ता; 4 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य