प्रतिनिधी
मुंबई : शरद पवारांच्या निवृत्ती नाट्याला आता राष्ट्रीय पातळीवरचा प्रतिसाद मिळू लागला आहे. पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा यासाठी अनेक नेत्यांनी मनधरणी केल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. काँग्रेसचे निलंबित खासदार राहुल गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि केरळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पी. सी. चाको यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून पवारांनी नेमका आत्ताच निवृत्तीचा निर्णय का घेतला,, याविषयीची माहिती घेतली. Sharad Pawar retirement news evokes national response
मात्र या सर्व नेत्यांनी पवारांना आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केल्याचे मराठी माध्यमांनी बातम्या नमूद केले आहे. अर्थात काँग्रेस आणि संबंधित प्रादेशिक पक्षांच्या तसेच राष्ट्रवादीतील अधिकृत सूत्रांनी त्याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही.
पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी विरोधकांच्या एकजुटीसाठी ते प्रयत्न करणार नाहीत असे त्यांनी म्हटलेले नाही त्यामुळे पवार विरोधी एकजुटीचा प्रयत्न करतीलच असे मानण्यास वाव आहे या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाचे राष्ट्रीय पातळीवर पडसाद पडून राहुल गांधी एम. के. स्टालिन, पिनराई विजयन आदी नेत्यांनी त्यांना फोन करणे हा त्यांच्या विरोधी एकजुटीच्या राजकारणाचा एक भाग आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांशी मधुर संबंध हे पवारांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर एकाच वेळी सत्तेच्या वळचणी जवळ राहण्याचा प्रयत्न करणे आणि त्याचवेळी विरोधी ऐकण्यासाठी एक प्रयत्न करत राहणे हाही पवारांच्या राजकारणाचा विशिष्ट गुण आहे. त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाचे पडसाद उमटले आहेत.
अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पवारांच्या निवृत्ती संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. किंवा यापैकी कोणीही खुद्द शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळे यांना फोन केल्याच्याही बातम्या मराठी माध्यमांनी दिलेल्या नाहीत.
Sharad Pawar retirement news evokes national response
महत्वाच्या बातम्या
- जंतरमंतरवर कुस्तीगीरांची पोलिसांशी बाचाबाची, बेड नेण्यावरून वाद, पहिलवानांचा आरोप– मद्यधुंद पोलिसांनी मारहाण, शिवीगाळ केली
- जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा; AK47, पिस्तूलासह इतर दारूगोळा जप्त
- कर्नाटकात काँग्रेस उमेदवाराच्या भावाच्या घरावर प्राप्तिकर विभागाचा छापा, झाडावर आढळले एक कोटी रुपये
- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग दहाव्यांदा वाढवले व्याजदर, 0.25 टक्के वाढ, 16 वर्षांतील सर्वोच्च