नाशिक : शांतिदूताचा बुरखा पांघरलेले पाकिस्तानी मध्यस्थीचे डेकोरेशन फसले अमेरिका आणि इराण यांच्यातली चर्चा फिस्कटल्यानंतर पाकिस्तानात अडचणीत आले, हे कालच्या एका रात्रीत घडले. अमेरिका आणि इराण यांची शिष्टमंडळे २१ तास चर्चा करून कुठलाही शांतता करार करू शकली नाहीत. त्यामुळे ही दोन्ही शिष्टमंडळे पाकिस्तानातून बिना करार निघून गेली. त्यामुळे पुन्हा एकदा जग युद्धाच्या खाईत लोटले गेले, पण त्याहीपेक्षा पाकिस्तानच अमेरिका आणि इराण यांच्या कात्रीत सापडले. Iran rejects
– शांतिदूताचा बुरखा
सगळ्या जगात दहशतवादाची निर्यात करणाऱ्या पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी शांतिदूताचा बुरखा पांघरला होता. दोन्ही देशांच्या नेत्यांना इस्लामाबाद मध्ये बोलवून त्यांनी शांती वार्ता करावी, यासाठी डाव टाकला होता. त्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भरपूर खर्च करून दोन्ही शिष्टमंडळाच्या स्वागताचे ढोल पिटले होते. सगळे इस्लामाबाद दोन दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये लोटले होते. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या विमानांनी अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांना एस्कॉर्ट केले होते. यातून पाकिस्तानला आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा शांतीचा मसिहा आहोत, हे दाखवून द्यायचे होते.
– अमेरिका – इराण चर्चा निष्फळ
पण अमेरिका आणि इराण यांच्या शिष्टमंडळांची 21 तासांची चर्चा पूर्णपणे निष्पळ ठरली. अमेरिका आणि इराण यांच्यावर कुठल्याच मुद्द्यावर एकमत होऊ शकले नाही. इराणने आपला अणू कार्यक्रम रद्द करायला नकार दिला. अमेरिकेची कुठलीही शरणागतीची पत्करायला करायला नकार दिला. अमेरिकेचे शिष्टमंडळ इराणी शिष्टमंडळावर दबाव आणण्यात अपयशी ठरले. तिथे पाकिस्तानची मध्यस्थी सुद्धा कामी येऊ शकली नाही. 21 तासांची चर्चा निष्कळ करून दोन्ही शिष्टमंडळे पाकिस्तानातून निघून गेली.
"A BIG NO": Iran rejects US demands as Islamabad Talks end in deadlock Read @ANI Story | https://t.co/jwhsk8O6Zk#Iran #US #Peace pic.twitter.com/NAuspnRmwo — ANI Digital (@ani_digital) April 12, 2026
"A BIG NO": Iran rejects US demands as Islamabad Talks end in deadlock
Read @ANI Story | https://t.co/jwhsk8O6Zk#Iran #US #Peace pic.twitter.com/NAuspnRmwo
— ANI Digital (@ani_digital) April 12, 2026
– जगावर युद्धाचे सावट, पाकिस्तान कात्रीत
– पण त्यामुळे जगावर पुन्हा एकदा युद्धाचे सावट आले. अमेरिका इराणवर आणखी मोठे लष्करी कारवाई करण्याची दाट शक्यता निर्माण झाली. पण त्यामुळेच पाकिस्तानी राज्यकर्ते अमेरिका आणि इराण यांच्या कात्रीत सापडले.
– अमेरिका इराणवर आणखी मोठे लष्करी कारवाईच्या तयारीत असताना पाकिस्तानवर त्यांचे हवाई तळ वापरू देण्यासाठी दबाव आणायची भीती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना निर्माण झाली.
– पाकिस्तानने अमेरिकेला आपले हवाई तळ वापरू दिले, तर इराण पाकिस्तानवर आणि अगदी इस्लामाबाद वर सुद्धा हल्ले करायची भीती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना वाटायला लागली.
– अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाची व्याप्ती वाढली, तर पाकिस्तानला एकाच वेळी तीन-चार आघाड्यांवर युद्ध लढावे लागण्याची भीती तयार झाली. पाकिस्तान आणि इराण यांच्यातील सीमारेषा अस्थिर झाली. उत्तरेकडून अफगाणिस्तान आणि पश्चिमेकडून येणार अशा कात्रीत सुद्धा पाकिस्तानी राज्यकर्ते सापडले.
– अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी करायला पाकिस्तानी राज्यकर्ते गेले, पण प्रत्यक्षात दोघांमधली चर्चा फिस्कटल्याने पाकिस्तानच त्यांनी अडचणीत आणून ठेवले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App