• Download App
    INDI Alliance INDI आघाडी ममता विरुद्ध राहुल नेतृत्वाचा नवा वाद; पण आणखी एक प्रादेशिक नेता देतोय ममतांना साथ!!

    INDI आघाडी ममता विरुद्ध राहुल नेतृत्वाचा नवा वाद; पण आणखी एक प्रादेशिक नेता देतोय ममतांना साथ!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर देशाच्या राजकारणावर जो परिणाम झाला, त्यामध्ये एक परिणाम INDI आघाडीत ममता विरुद्ध राहुल नेतृत्वाचा नवा वाद निर्माण झाले होण्यात झाला. काँग्रेसचे नेतृत्व INDI आघाडीचे नेतृत्व करण्यात कुचकामी ठरल्याने आघाडीचे नेतृत्व आपल्याकडे द्यावे, असा आग्रह ममतांनी धरल्याबरोबर त्यांच्या पाठीशी अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, शरद पवार यांच्यासारखे प्रादेशिक नेते उभे राहिले. त्यांच्यापाठोपाठ आणखी एक प्रादेशिक नेता ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी उभा राहिला तयार झाला आहे. INDI Alliance Mamata vs Rahul leadership new controversy

    आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वाय. एस. आर. काँग्रेसचे नेते जगन मोहन रेड्डी यांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाला पाठिंबा देत INDI आघाडीत चंचू प्रवेश करण्याचे सुतोवाच केले आहे. वाय. एस. आर. काँग्रेसचे खासदार आणि जगन मोहन रेड्डी यांचे विश्वासू विजय साई रेड्डी यांनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाला वाय. एस. आर. काँग्रेस पाठिंबा देईल, असा निर्वाळा दिला. त्यामुळे राहुल विरुद्ध ममता लढतीमध्ये आणखी एक प्रादेशिक नेता ममता बॅनर्जींच्या पाठीशी उभा राहिल्याने ममता बॅनर्जींची बाजू अधिक बळकट झाली आहे.

    EVMs विरोधात INDI आघाडीची एकी; पण राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल बेकी!!

    देशातल्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात EVMs विरोधात INDI आघाडीची एकी पण राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल मात्र बेकी!! अशी विरोधकांची अवस्था झाली आहे.

    INDI आघाडीतले सगळे विरोधी पक्ष आता इथून पुढची निवडणूक इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वर नकोच बॅलेट पेपरवरच हवी यासाठी एकमुखाने बोलत आहेत. यातून त्यांनी अर्धी लढाई एकत्र चालवली आहे, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात एकजुटीने लढायची वेळ आल्यावर मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल मात्र काँग्रेस नेत्यांची तोंडे एकीकडे, बाकी सगळ्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांची तोंडे दुसरीकडे अशी INDI आघाडीची अवस्था झाली आहे.

    पण राहुल गांधींच्या नेतृत्वात INDI आघाडीने एकजुटीने सगळीकडे निवडणूक लढवायची या मुद्द्यावर मात्र आघाडीतली बेकी समोर आली. ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करून INDI आघाडीचे नेतृत्व स्वतः करायची इच्छा दाखवल्याबरोबर शरद पवार, लालूप्रसाद यादव, अखिलेश यादव वगैरे नेते ममता बॅनर्जींच्या पाठीशी ठाम उभे राहिले. या सगळ्यांनी ममता बॅनर्जींच्या तडफदार नेतृत्वाची प्रशंसा केली, पण काँग्रेसचे नेते मात्र दुसऱ्या दिशेला तोंड करून उभे राहिले. काँग्रेस नेत्यांनी ममतांच्या नेतृत्वाच्या प्रादेशिक मर्यादेवर बोट ठेवले. तरी देखील वाय. एस. आर. काँग्रेस ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी ठाम उभी राहिली आहे.

    INDI Alliance Mamata vs Rahul leadership new controversy

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    फुटलेले दोघे एकमेकांचेच काढताहेत वाभाडे; भाजप आणि काँग्रेस नामानिराळे!!

    Rahul Gandhi पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे निमंत्रण विषयावर राहुल गांधी खोटे बोलले परराष्ट्र मंत्र्यांनी वाभाडे काढले!!

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत सांगितली “मेड इन चायना”ची कहाणी; पण इज्जत आपल्याच खानदानी सरकारांची काढली!!