Sharad Pawar : ‘’ऑपरेशन सिंदूरवर विशेष सत्र बोलवण्याची गरज नाही, हे प्रकरण…’’
ऑपरेशन सिंदूरवरील राजकारण थांबता दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ऑपरेशन सिंदूरवर विशेष सत्र बोलवण्याची गरज नाही. ही एक अतिशय संवेदनशील बाब आहे आणि त्यावर खुली चर्चा शक्य नाही. विरोधकांची अशी मागणी योग्य नाही.