MP Omraje Nimbalkar : ऑपरेशन टायगरचे ‘किंगमेकर’ ठरणार ओमराजे, एका निर्णयावर ठरणार ठाकरे-शिंदेंची पुढील राजकीय लढाई
महाराष्ट्रातील शिवसेनेतील सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळाले असून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडाचा मार्ग स्वीकारल्यानंतर आता सर्वांचे लक्ष ओमराजेंच्या भूमिकेकडे लागले आहे. ते उद्धव ठाकरेंसोबत राहणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार, यावर ‘ऑपरेशन टायगर’चे भवितव्य अवलंबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.