Eknath Shinde : शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची, टोमणे सम्राटांची नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्माला आलो नसलो, तरी मी जनतेला सोन्याचे दिवस दाखविले आहे. शिवसेना हा मालक-नोकरांचा पक्ष नाही, तर सच्चा शिवसैनिकांचा व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्ता आहे. हा पक्ष तुमचा आहे, इथे काही कुणी मालक नाही. राजा का बेटा राजा नहीं बनेगा असे श्रीकांत शिंदेही म्हणाले होते.