Sharad Pawar : शरद पवारांची सरकारकडे मागणी- पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांसाठी ‘पुनरुज्जीवन आराखडा’ हवा
राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारने आपत्ती निवारणाची महत्त्वाची कामे तातडीने हाती घ्यावीत, असे आवाहन केले आहे. त्यांनी नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा ठोस आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.