Eknath Shinde : रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, तीन पक्षांतरांनंतर घरवापसी
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आज संध्याकाळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उपसभापती नीलम गोऱ्हे आणि प्रकाश सुर्वे यांची उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी रवींद्र धंगेकरांसोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तीन पक्षांतर केल्यानंतर धंगेकर यांची शिवसेनेत घरवापसी झाली.