WATCH : पाचोऱ्यात विद्यार्थ्यांचा सलग ३० मिनिटे स्केटिंग करून विश्वविक्रम; आंतरराष्ट्रीय बुकमध्ये नोंद ; चिमुकल्यांमुळे पाचोरा जगाच्या नकाशात चमकले


विशेष प्रतिनिधी 

जळगाव : पाचोऱ्यातील विद्यार्थ्यांनी सलग ३० मिनिटे स्केटिंग करून विश्वविक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

वर्ल्डवाईड इव्हेंट्स प्लॅनर्स प्रेझेंट तर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड २०२१ मध्ये भाग घेउन सलग ३० मिनिटे स्केटिंग केले. त्याबद्दल शहरातील १० विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. विक्रमात सहभागी झालेले आयुष मोरे,आराध्य पाटील,अथर्व मराठे,नील सोनवणे, रियांश पाटील, विवेक गायकवाड, अक्षय चव्हाण, श्रेयस शिंदे, अतिक साटोटे, ईशान मोरे, यांचे अभिनंदन होत आहे.

  • – गणराज स्पोर्ट्स अकॅडमीचे यश
  • – शारीरिक शिक्षक सुनिल मोरे यांचे मार्गदर्शन
  • -तायकाॅंदो,कराटे,योगा, नृत्याचे प्रशिक्षण ते देतात
  • – १५ वर्षापासून मोरे कार्यरत आहेत
  • – चाकोरीबद्ध जीवनातून बाहेर पडण्याचे धाडस
  • – दहा विद्यार्थ्यांकडून सलग ३० मिनिटे स्केटिंग
  • -वर्ल्डवाईड इव्हेंट्स प्लॅनर्स प्रेझेंट तर्फे आयोजन

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात