We will succeed! BCCI ground in the fight against Corona; Donate 2,000 Oxygen Concentrators; What did Dada And jay Shah said?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देश सध्या कोरोना साथीच्या आजाराशी झुंज देत आहे. भारतात नवीन प्रकरणांमध्ये घट झाली असली तरी मृतांचा आकडा वाढत आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोरोनाविरूद्धच्या या लढ्यात मदतीचा हात पुढे केला आहे. अफाट संपत्ती असलेल्या या संस्थेने लोकांना मदत करण्यासाठी २ हजार ऑक्सिजन केंद्रे देण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ही माहिती ट्विट केली आहे.
अनेक ठिकाणी सेलिब्रेटी, क्रिकेटपटू, फिल्मस्टार्स सरकारी यंत्रणांना मदत करत आहेत. अशातच BCCI ही या लढाईत रस्त्यावर उतरलं आहे.We will succeed! BCCI ground in the fight against Corona; Donate 2,000 Oxygen Concentrators; What did Dada And jay Shah said?
BCCI to contribute 10-Litre 2000 Oxygen concentrators to boost India’s efforts in overcoming the COVID-19 pandemic. More details here – https://t.co/XDiP374v8q #IndiaFightsCorona pic.twitter.com/BhfX8fwirH — BCCI (@BCCI) May 24, 2021
BCCI to contribute 10-Litre 2000 Oxygen concentrators to boost India’s efforts in overcoming the COVID-19 pandemic.
More details here – https://t.co/XDiP374v8q #IndiaFightsCorona pic.twitter.com/BhfX8fwirH
— BCCI (@BCCI) May 24, 2021
बीसीसीआयने या लढाईत २ हजार Oxygen Concentrators दान करण्याचं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना अनेक राज्यांत ऑक्सिजन अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले होते. भविष्यात देशामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यताही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ नये यासाठी बीसीसीआयने ही मदत केली आहे.
मेडिकल आणि हेल्थकेअर क्षेत्राने मोठी भूमिका बजावली – सौरव गांगुली
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, ‘बीसीसीआयला माहित आहे की कोरोना विषाणूविरूद्ध युद्धात वैद्यकीय आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाची भूमिका आहे. ते खरोखरच आमचे आघाडीचे योद्धे आहेत आणि त्यांनी आमच्या संरक्षणासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. मंडळ नेहमीच आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोपरि ठेवते. अशावेळी त्यांच्या या लढाईत या Oxygen Concentrators ची मदत होईल.”
जय शाह खांद्याला खांदा लावून उभे आहेत त्याच वेळी सचिव जय शाह म्हणाले की, ‘कोरोना साथीच्या विरूद्ध सामूहिक लढा देण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून उभे आहोत. या संकटाच्या वेळी बीसीसीआय वैद्यकीय उपकरणांची नितांत आवश्यकता समजून घेतो आणि आशा करतो की या प्रयत्नामुळे देशभरात निर्माण झालेल्या ऑक्सिजनची मागणी-पुरवठा कमी होण्यास मदत होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App