Uttar Pradesh Naming : नामांतराची मालिका सुरूच ; फैजाबाद रेल्वे जंक्शन आता ‘अयोध्या कॅन्ट’ ! नेटकरी म्हणाले मुख्यमंत्री योगी करू शकतात ठाकरे-पवार सरकार कधी करणार?


 

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : एकीकडे परकीय आक्रमकांच्या नावाने असलेल्या शहरांची नामांतरे करण्याचा धडाका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लावला आहे.उत्तर प्रदेश सरकार मोठ मोठे निर्णय घेत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र औरंगाबाद या शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याचे फक्त आश्वासन ठाकरे-पवार सरकार देत आहे.Uttar Pradesh: Naming series continues; Faizabad railway junction now ‘Ayodhya cant’! Public says yogiji can do , when will Thackeray-Pawar do it?

 

औरंगाबादचे नामांतर केवळ निवडणुका आल्या की आठवते.शिवसेनेला सत्तेत येऊनही दोन वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही अद्याप नामांतर करणे यांना जमत नाही .अशा प्रतिक्रिया जनसामान्यांतून उमटतं आहेत.

योगींच्या नामांतराच्या या यादीत आता फैजाबाद रेल्वे जंक्शनचं देखील नाव आलंय. उत्तर प्रदेश सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयानुसार फैजाबाद रेल्वे जंक्शनचे नाव बदलून अयोध्या कॅन्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नाव बदलण्याच्या घेतलेल्या निर्णयावर आनंद व्यक्त करीत त्यांचे आभार मानले आहेत. योगी सरकारने यापूर्वी अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचे नाव बदलून अयोध्या केले आहे. याच मालिकेत मुगलसरायचे नाव बदलून दीनदयाल उपाध्यायनगर करण्यात आले आहे. राज्य सरकारने काही काळापूर्वी झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून राणी लक्ष्मीबाई करण्याची शिफारस केली. या व्यतिरिक्त अलिकडेच योगी सरकारने दिल्लीतील यूपी भवनचे नाव उत्तरप्रदेश त्रिवेणी सदन, तर यूपी भवनाचे नाव उत्तरप्रदेश भवन संगम करण्याची घोषणा केली होती.

 

Uttar Pradesh: Naming series continues; Faizabad railway junction now ‘Ayodhya cant’! Public says yogiji can do , when will Thackeray-Pawar do it?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात