वृत्तसंस्था
महाड येथील पूरग्रस्तांना केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून ठेवले आहे का ? पुरानंतर एक महिना झाला तरी सुद्धा तातडीची मदत नाही.तातडीची मदत मिळत नसेल तर सरकार नुकसान भरपाई काय देणार ? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या आहेत. To the flood victims at Mahad Just a carrot of promises
२२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यासह कोकणात हाहाकार उडाला. सावित्री नदीच्या जल प्रकोपाने महाड शहर उध्दवस्त झाले. अनेक स्वयंसेवी संस्था, सामजिक संस्था, समाजसेवक यांनी तत्काळ मदत केली. प्रशासनाकडून अनेक दौरे झाले. अनेक नेते पहाणी करुन गेले. पंचनामे देखील झाले. परंतु महिना व्हायला आला तरी तत्काळ घोषित झालेली १०,००० रुपयांची मदत मिळालेली नाही. महाड शहरातील पूरग्रस्त नागरिक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे आता तरी मदत मिळणार की फक्त मदतीच्या नावाखाली आश्वासनांचा गाजर हाती पडणार ? हाच प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App