चित्र काढणे जशी एक कला आहे. तसेच, गुंतवणूक करणे हि पण एक कला आहे. तुमचे गुरुजी महत्वाच्या गोष्टी तुम्हाला शिकवतील, ब्रश कोणता वापरायचा, कसा पकडायचा, रंग कोणता वापरायचा, कसा तयार करायचा शिकवतील. पण तुमच चित्र तुम्हालाच काढव लागत, तसेच गुंतवणुकीचे आहे. The poor, the middle class and the rich spend differently
दुसरे तुम्हाला महत्वाच्या मुलभूत गोष्टी सांगू शकतात. पण गुंतवणुकीचा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. फसवणारे लोक तुम्हाला दाखवतात कि पैसा कमावणे फार सोपे, काही काम करायची गरज नाही, चिंता नाही, आरामात पैसा बनेल. पण तसे नाही तुम्हाला शिकत रहाव लागेल.
लक्ष्य ठेवाव लागेल तुमच्या गुंतवणुकीबद्दल काय सुरु आहे, काय नाही. दुसऱ्यान पैसे कमावले ते आपल्याला दिसते, त्याने काय मेहनत केली, ते पाहणे आवश्यक आहे. संपत्ती म्हणजे अशी गोष्ट जेथे पैसा लावून तुमचा पैसा वाढवता येतो. गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत यातील फरक प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. गरीब जेवढे कमावतो. तेवढे खर्च करतो. काहीच बचत करत नाही. गुंतवणूकदेखील करीत नाही.
मध्यमवर्गीयाचे पहा, ते काही पैसे वाचवतात, त्यापासून ते दायित्व विकत घेतात. महाग कपडे, घड्याळ, मोबाईल, गाड्या अश्या गोष्टी ज्या पासून पैसा वाढत नाही. आता श्रीमंतांचे पाहू, श्रीमंत माणूस काय करतो ? तो जागा विकत घेतो, शेअर बाजारात गुंतवणूक करतात, मुदत ठेवीत पैसे गुंतवतात. अश्या गोष्टी विकत घेतो ज्यापासून पैसा वाढत जातो. साहजिकच आहे कि, श्रीमंत पण खर्च करतात, पण त्यांचा खर्च, त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात इतरांशी तुलना करता कमी असतो.
गुंतवणूक जास्त असते. असे नसेल तर ते पण काही काळाने गरीब होतील. गुंतवणूक करताना आपण हा विचार नाही केला पाहिजे, कि खर्च करून किती उरेल? गुंतवणूक करताना आपण पाहिले पाहिजे कि आपल्याला किती पैसे लागणार आहेत? त्यासाठी आज किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणेच खर्च व गुंतवणूक केली पाहिजे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App