वृत्तसंस्था
नवी दिल्ली : फ्रान्सचा जगविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस याने २०२२ या वर्षासाठी धक्कादायक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यामध्ये अणुबॉम्बच्या स्फोटामुळे महाविनाश, समुद्रात उल्कापाताने प्रलय, जग तीन दिवस अंधारात आणि रोबोट मानव जात नष्ट करतील यांचा समावेश आहे. The explosion of an atomic bomb, a catastrophic flood at sea; Nostradamus shocking prediction for 2022
नॉस्ट्राडेमसच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरत असल्याचे काहींचे मत आहे. २०२१मध्ये दुष्काळ, जागतिक महामारी यासारखी संकटे येतील, अशी भविष्यवाणी नॉस्ट्राडेमसने केल्याचे सांगण्यात येते आहे. अनेकजण या भविष्यवाणीला कोरोनाशी जोडून पाहात आहेत.
शतकांपूर्वी लेस प्रोफेटिस या पुस्तकात त्याने अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. प्रत्येक वर्षासाठीच्या भविष्यवाण्या या पुस्तकात दिल्या आहेत. नॉस्ट्राडेमसच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरत असल्याचे काहींचे मत आहे. २०२१मध्ये दुष्काळ, जागतिक महामारी यासारखी संकटे येतील अशी भविष्यवाणी नॉस्ट्राडेमसने केली होती. अनेकजण या भविष्यवाणीला कोरोनाशी जोडून पाहत आहेत. २०२२ या वर्षासाठीदेखील नॉस्ट्राडेमसने धक्कादायक भविष्यवाण्या केल्या आहेत.
जागतिक महागाईचे संकट
भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये जगभर महागाई येणार आहे. अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य घसरणार आहे. २०२२ मध्ये सोने, चांदी, बिटकॉइन गुंतवणुकीत मोठी वाढ होईल.
पृथ्वीवर धडकणार अशनी
स्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये पृथ्वीवर खूप मोठी अशनी किंवा उल्का धडकणार आहे. यामुळे मोठा विध्वंस होईल. हा अशनी समुद्रात कोसळणार असल्यामुळे समुद्रात महाकाय लाटा उसळतील आणि जगभरातील समुद्रात मोठे वादळ तयार होईल. या लाटांमुळे मोठे नुकसान होऊ शकेल.
प्रलयंकारी अणुस्फोट
नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार पुढीलवर्षी एक भयानक अणुस्फोट होईल आणि यामुळे पर्यावरणात मोठा बदल होईल. याचा पृथ्वीवर विपरित परिणाम होईल. एका चाचणीदरम्यान भूमध्य समुद्रात प्रचंड मोठा स्फोट होण्याची भविष्यवाणी वर्तवली आहे.
संपूर्ण पृथ्वीवर तीन दिवस अंधार
नॉस्ट्राडेमसनुसार आधी भयंकर विध्वंस येईल आणि मग शांतता येईल. पृथ्वी ३ दिवसांसाठी अंधारात बुडून जाईल. पृथ्वीवर आमुलाग्र बदल होतील. आधुनिकता नष्ट होईल आणि मानवाची वाटचाल पाषाण युगाकडे होईल.
फ्रान्समध्ये भयंकर वादळ
नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२२ मध्ये फ्रान्समध्ये एक भयंकर वादळ येईल. याचा परिणाम होत जगभरातील अनेक भागात, दुष्काळ, आग आणि पूर अशी परिस्थिती निर्माण होतील. २०२२ मध्ये जगात उपासमार होईल.
रोबोटचा मानवजातीवर हल्ला
नॉस्ट्रेडेमसच्यानुसार कॉम्प्युटर मानवी मेंदूवर नियंत्रण मिळवण्याएवढे सक्षम होतील. रोबोट मानव जात नष्ट करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App