• Download App
    रोहित पवारांनी आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा सुनेत्रा, पार्थ आणि जय पवारांची नरेश अरोरांच्या बंधूंशी पुण्यात चर्चा!!, रोहित पवारांच्या narrative वर फेरले पाणी!! – The Focus India

    रोहित पवारांनी आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा सुनेत्रा, पार्थ आणि जय पवारांची नरेश अरोरांच्या बंधूंशी पुण्यात चर्चा!!, रोहित पवारांच्या narrative वर फेरले पाणी!!

    Sunetra Pawar

    नाशिक : ज्या नरेश अरोरा यांच्यावर रोहित पवारांनी आक्षेप घेतला, त्याच नरेश अरोरा यांच्या बंधूंना सुनेत्रा, पार्थ आणि जय पवार भेटले. पुण्यातल्या सर्किट हाऊस मध्ये त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या अंतर्गत वर्तुळात सुनेत्रा पवार विरुद्ध रोहित पवार यांच्यातले राजकीय द्वैत समोर आले.Sunetra Pawar meets with naresh Arora team in Pune

    – रोहित पवारांचे आक्षेप आणि दावे

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर तब्बल तेरा दिवसांनी रोहित पवारांनी पत्रकार परिषदांची झडी लावली. या पत्रकार परिषदांमध्ये रोहित पवारांनी सिलेक्टिव्हली अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना टार्गेट केले त्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ धनंजय मुंडे यांचा समावेश राहिला, पण त्या पलीकडे जाऊन रोहित पवारांनी डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख आणि अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. अजित पवारांना नरेश अरोरा यांना दिलेले कॉन्ट्रॅक्ट रद्द करायचे होते, पण राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी नरेश अरोरांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नये. त्यांना कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावेत, यासाठी अजित पवारांवर दबाव आणला होता. राष्ट्रवादीतल्या चार-पाच नेत्यांनी अजित पवारांना एकटे पाडले होते. अजित पवार हे सगळे आमच्याशी बोलत होते, असा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला होता.



    – नरेश अरोरांच्या टीम बरोबर सुनेत्रांची चर्चा

    रोहित पवारांनी नरेश अरोरा यांच्या तीव्र आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी काल सायंकाळी पुण्यातल्या सर्किट हाऊस मध्ये नरेश अरोरा यांच्या टीम बरोबर चर्चा केली. या टीम मध्ये नरेश अरोरांच्या बंधूंचा समावेश होता. या चर्चेचे तपशील जरी बाहेर येऊ शकले नसले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड येत्या पंधरा दिवसांमध्ये करायची आणि सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करायचे, अशा आशयाची बातमी त्याच वेळी राजकीय वर्तुळात फिरली.

    – प्रफुल्ल पटेल राहणार कार्याध्यक्ष

    नरेश अरोरा टीम आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटी आधी कोल्हापुरातून हसन मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील, पण त्याचवेळी प्रफुल्ल पटेल हेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष राहतील असे वक्तव्य करून मोठा राजकीय बॉम्ब टाकला त्या पाठोपाठ नरेश अरोराच्या टीमने सुनेत्रा पवार पार्थ आणि जय पवार यांची भेट घेतली. या सगळ्या राजकीय घडामोडीचा अर्थ अजित पवारांचे कुटुंब आणि शरद पवारांचे कुटुंब पूर्ण वेगळे झाले आणि ते राजकीय दृष्टीने सुद्धा वेगळेच वाटचाल करू लागलेत असाच काढला जातोय. शरद पवार यांच्या कुटुंबाच्या वतीने बोलणाऱ्या रोहित पवारांनी तीव्र आक्षेप घेऊन सुद्धा सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी नरेश अरोरांच्या टीम बरोबर चर्चा केल्याने अजित पवार यांना नरेश अरोरांच्या बरोबर झालेले कॉन्ट्रॅक्ट तोडायचे होते, या रोहित पवारांच्या narrative वर पाणी फेरले गेले.

    Sunetra Pawar meets with naresh Arora team in Pune

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET exam : नीट परीक्षेतील गुण घोटाळ्याचे दावे पूर्णपणे निराधार; हायकोर्टाने 4 याचिका फेटाळल्या; बनावट कागदपत्रांमुळे विद्यार्थ्यांना ठोठावला दंड

    Maharashtra Loan Waiver Scheme : आयकरदाते 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले; सहकार विभागाकडून 32 लाख बळीराजाची डेटा पडताळणी

    Earthquakes : नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के; 6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र