WATCH : सांगलीवर पसरली गर्द धुक्याची चादर जनजीवनावर परिणाम, कृष्णाकाठी धुक्याचा प्रभाव


वृत्तसंस्था

सांगली : शहर आज दाट धुक्‍यात हरवून गेले.थंडीमुळे शहरावर धुक्याची चादर पसरली होती. थंडी बरोबर धुक्याच्या अनुभव सांगलीकरांना मिळाला.या धुक्याचा प्रभाव सकाळी १० पर्यंत होता, त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून सांगलीमध्ये थंडी वाढली आहे. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीमुळे सांगलीकर गारठले असताना आज पहाटेपासून सांगली शहरात प्रचंड धुके पडले होते.

कृष्णाकाठी धुक्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. सांगली शहरावर तर धुक्याची चादर पहाटेपासून पसरली होती.सकाळी १० वाजेपर्यंत सांगली धुक्यात हरवून गेली होती.तसेच शहरा बरोबरच ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी धुके पसरले होते.त्यामुळे सांगलीकरांना थंडी बरोबर धुक्याचाही अनुभव मिळाला,तसेच त्यामुळे शहरातल्या जनजीवनावर काही काळ परिणाम झाल्याचा दिसून आला.

https://youtu.be/xcwpquGPtAo

  •  सांगलीवर पसरली गर्द धुक्याची चादर
  • धुक्याचा प्रभाव सकाळी १० पर्यंत
  •  जनजीवनावर परिणाम, कृष्णाकाठी धुक्याचा प्रभाव
  •  काही दिवसापासून थंडीमुळे सांगलीकर गारठले
  •  ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी धुके

Spread over Sangli A sheet of thick fog

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात