शिवसेनेला शेतीमधलं काय कळतं ? शेती हा त्यांचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : शिवसेनेला शेतीमधलं काय कळतं ? शेती हा त्यांचा विषय नाही. शिवसेनेला तेवढी अक्कलही नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. Shiv Sena Nilesh Rane latest news
रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शिवसेना हा गोंधळलेला पक्ष आहे. शिवसेनेला आता उतरती कळा लागली आहे. दिल्लीत शिवसेनेला कुणीच किंमत देत नाही. अलीकडच्या काळात शिवसेना कोणत्याच एका भूमिकेवर ठाम राहिलेली नाही. एक दिवस असा येईल की, महाराष्ट्राची जनता त्यांना किंमत देणार नाही.
राणे म्हणाले की, कृषी कायद्यात बदल करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 2010 साली केली होती. आता या कायद्यांना त्यांच्याकडून होणारा विरोध अनाकलनीय आहे. फक्त नरेंद्र मोदींनी हा कायदा आणला म्हणून त्याला विरोध केला जात आहे. फक्त पंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील तीव्रता जास्त आहे. इतर कुठल्याही राज्यांमध्ये तशी परिस्थिती नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App