• Download App
    बंगालच्या निवडणुकीत पवार लक्ष घालणार; केंद्राच्या हस्तक्षेपाबाबत ममतांना सल्ला देणार | The Focus India

    बंगालच्या निवडणुकीत पवार लक्ष घालणार; केंद्राच्या हस्तक्षेपाबाबत ममतांना सल्ला देणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँगेसला गळती लागलेली असताना ज्येष्ठ नेते शरद पवार त्यात लक्ष घालणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी निमित्त त्या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत केंद्र सरकार लक्ष घालत असल्याचा बहाणा केला आहे.  sharad pawar will meet mamata banerjee in kolkata soon

    केंद्र सरकार राज्य सरकारच्या अधिकारांचे हनन करून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पाडण्याचे षडयंत्र रचत आहे. कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्र सरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. sharad pawar will meet mamata banerjee in kolkata soon

    या गंभीर विषयासंदर्भात ममता बॅनर्जींशी शरद पवारांची चर्चा झाली असून गरज पडल्यास पश्चिम बंगालमध्ये पवार जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

    येत्या काही दिवसांत सर्व पक्षांशी दिल्लीत चर्चा करून एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर शरद पवार करतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

    sharad pawar will meet mamata banerjee in kolkata soon

    सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून मोदी सरकारला जेरीस आणायचा पवारांचा मनसूबा आहे. काँग्रेस सोडून अन्य पक्ष साथ देतील असा पवारांचा होरा आहे. पण आत्ता संख्यात्मक पातळीवर काँग्रेससह सर्व प्रादेशिक पक्ष भाजपच्या पासंगालाही पुरत नाहीत. त्यामुळे संसदेतली संख्या कशी वाढवायची ही डोकेदुखी पवारांना सतावणार आहे.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…